कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी कणेरीवाडी (ता, करवीर) येथील महावीर हिराचंद संगणवार या युवकाने कागल येथील लक्ष्मी टेकडीपासून कोल्हापूरात श्री अंबाबाई मंदीरपर्यत असे सुमारे १८ किमी दंडवत घालत देवीला साकडे घातले.
निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच उमेदवारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी सोमवारी भर तळपत्या उन्हात युवकाने चक्क लक्ष्मी टेकडी ते कोल्हापूरात श्री अंबाबाई मंदीर असा सुमारे १८ किमी लांबीचा प्रवास दंडवत घालत पूर्ण केला. सकाळी ९ वाजता कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे देवीची आरती करुन या दंडवतला प्रारंभ झाला. राष्टÑीय महामार्गावरुन कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक, शाहू मील, पार्वती मल्टीप्लेक्स, टेंबे रोड मार्गे ते श्री अंबाबाई मंदीरात दंडवत घालत पोहचले.
उन्हाचा तडाखा असतानाही पायात चपला न घातला, डांबरी मार्गावर महावीर हा दंडवत घालताना त्याचे सहकारी त्याच्या अंगावर पाणी ओतून तसेच त्याला एनर्जी ड्रींक्स देत त्याला सहकार्य करत होते. मार्गावरच कणेरीवाडीजवळ कृष्णराज महाडिक यांनी त्याची भेट घेऊन त्याच्या धाडसाचे कौतुक केले. त्यानंतर दुपारी २ वाजता तो मंदीरात पोहचल्यानंतर विश्वराज महाडिक यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंदीरात श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेताना त्याने खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याचे देवीला साकडे घातले.सुरेशराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला प्रारंभ झाला, यावेळी महाडिकप्रेमी सुमीत शेळके, अक्षय मोरे, महेश खोत, अमर खोत, श्ौलेस खोत, किरण जगदाळे, रणजीत भोसले, सचीन शेळके, अमोल मोरे, अविनाश खोत, अभिजीत खोत, विजय पाटील, योगेश् ढवळे, विकी मोरे, प्रशांत मोरे, संतोष परब, समीर शेख आदी उपस्थित राहून महावीरला सहकार्य करत होते.दुसऱ्यांदा साकडेगेल्या लोकसभा निवडणुकीत २८ फेब्रुवारी २०१४ रोजी कागल लक्ष्मीटेकडी ते कोल्हापूर श्री अंबाबाई मंदीरपर्यत महावीर संगणवार याने दंडवत घालत धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी देवीला साकडे घातले होते, त्यानंतर सोमवारी त्याने पुन्हा देवीला साकडे घातले.