शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

एकरकमी ‘एफआरपी’ने किमान २५०० रूपये मिळणारच

By admin | Published: November 18, 2014 9:13 PM

जिल्ह्यातील कारखान्यांचा १२.७५ ते १३.४० सरासरी साखर उतारा : बिद्री, कुंभी, गुरुदत्त, दालमिया, शाहू, भोगावती आघाडीवर

प्रकाश पाटील- कोपार्डे --कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शाहू व गुरुदत्त वगळता ऊसदराबाबत मौन पाळत हंगाम सुरू केले. मात्र, ऊसदर नियामक मंडळाच्या बैठकीत एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक आहे. जे एकरकमी एफआरपी देणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे घोषित केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना किमान २५०० रुपयांपर्यंत तरी एकरकमी मिळणार असल्याचे चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या सर्वच २१ साखर कारखान्यांचे हंगाम २०१३-१४ मधील साखर उतारे १२.५० ते १३.४० च्या दरम्यान आहेत. या सर्व साखर कारखान्यांची एकूण एफआरपी ३००० ते ३१५०च्या दरम्यान होते. यातून तोडणी वाहतूक खर्च ४५० वजा जाता किमान २४५० ते २६८० रुपये प्रतिटन एफआरपीप्रमाणे ऊसदर निघत आहे.शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ मधील कलम ७(अ) प्रमाणे कारखान्यांनी गाळपासाठी ऊस तोडून नेल्यानंतर किमान १४ दिवसांत त्या उसाची प्रतिटन एफआरपी शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे, असे न केल्याने एखाद्या शेतकऱ्याने याबाबत दाद मागितल्यास साखर आयुक्तालयाकडून त्याबाबत कारवाई करीत फौजदारी दाखल होऊ शकते. मात्र, हा कायदा झाल्यानंतर आजपर्यंत या कायद्याखाली कोणत्याही कारखानदारांवर गुन्हा नोंद होऊन कारवाई झाल्याचे आजपर्यंत राज्यात एकही उदाहरण नाही.मात्र, केवळ आंदोलने, त्याचा गाळप हंगामावर होणारा परिणाम, यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संघटनांनी मवाळ भूमिका घेऊन कायद्याची लढाई लढण्यासाठी व्यूहरचना केली असून, त्याला आता ऊसदर नियामक मंडळाची साथ मिळणार आहे.ऊसदर नियामक मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे मुख्य सचिव क्षत्रिय स्वाधीन यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास त्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची घोषणाच केल्याने आता कारखानदारांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री, कुंभी, गुरुदत्त, शाहू, दालमिया, भोगावतीसह किमान १५ कारखान्यांचा सरासरी उतारा १२.५० ते १३.४० टक्के एवढा असल्याने किमान २५०० रुपये एफआरपीने ऊस उत्पादकांना मिळणार आहेत.२०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ४५० रुपये तोडणी व वाहतूक वजा जाता द्यावा लागणारा एफआरपीप्रमाणे ऊसदरकारखान्याचे नावसरासरीएफआरपीप्रमाणे साखर उताराद्यावा लागणारा दरमंडलिक, हमीदवाडा१३.३८२६५०कुंभी-कासारी, कुडित्रे१३.३३२६४०बिद्री१३.३३२६४०दत्त दालमिया१३.१५२६३०भोगावती१३.०५२५८०शाहू, कागल१३.०५२५८०गुरूदत्त, टाकळी१३.२३२६३०पंचगंगा, इचलकरंजी१३.००२५६२शरद, नरंदे१३.१०२६०१कारखान्याचे नावसरासरीएफआरपीप्रमाणे साखर उताराद्यावा लागणारा दरदत्त, शिरोळ१२.७५२५०४वारणा१२.४७२५२५जवाहर१२.५७२४४६डी. वाय. पाटील, पळसंबे१२.४३२४४६राजाराम, बावडा१२.४०२४४०आजरा, गवसे१२.५१२४४६गडहिंग्लज, हरळी१२.०३२३००इको केन, नलवडे१३.२७२६४०हेमरस१३.१२२५९५