शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जादूच्या प्रयोगात रमली बालमने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:56 PM

कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, संगीताचा ठेका आणि डोळ्याची पापणी लवते न लवते, तोपर्यंतच चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार विश्वसम्राट यांनी उपस्थित बालचमूंनाच थक्क केले. जादूच्या प्रयोगाच्या या मायाजालात तब्बल दीड तास बालकांची मने रविवारच्या दुपारी आनंदात रमली होती. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने आयोजित विशेष जादूच्या प्रयोगाचे.रविवारी राजारामपुरीतील ...

कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, संगीताचा ठेका आणि डोळ्याची पापणी लवते न लवते, तोपर्यंतच चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार विश्वसम्राट यांनी उपस्थित बालचमूंनाच थक्क केले. जादूच्या प्रयोगाच्या या मायाजालात तब्बल दीड तास बालकांची मने रविवारच्या दुपारी आनंदात रमली होती. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने आयोजित विशेष जादूच्या प्रयोगाचे.रविवारी राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ‘लोकमत बाल विकास मंच’ सबस्क्रिप्शनर्ससाठी जादूई नगरीचे बेताज बादशाह जादूगार विश्वसम्राट यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन जादूगार विश्वसम्राट, फ्लाईग किडस्च्या इंद्रायणी पाटील, मदर केअर इंटरनॅशनल स्कूलचे प्रा. विकास येसादे व सखी मंच कमिटी मेंबर यांच्या हस्ते करण्यात आले.रविवारच्या सुटीची धमाल; त्यामध्येच जादूचे दर्जेदार प्रयोग पाहण्याची अनोखी पर्वणी ‘बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनर्सना मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगणित झाला होता. जादूगार विश्वसम्राट यांनी स्पेशल लाईट इफेक्टच्या माध्यमातून दमदार एंट्री करताच मुलांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.जादूई नगरीचे बेताज बादशाह जादूगार विश्वसम्राट यांनी आपल्या अद्भुत प्रयोगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. यामध्ये बॉक्समधील मुलाला गायब करून प्रेक्षकांत बसविणे, प्रेक्षकांतीललहान मुलग्याला अचानक स्टेजवर आणणे, हवेत खुर्ची उडविणे असे अनेक जादूई प्रयोग करून त्यांनी आश्चर्याने मुलांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.जादू हे करमणुकीचे साधनजादूगाराकडे कोणतीही दैवी शक्ती नसते. जादूचे प्रयोग म्हणजे विज्ञान व हातचलाखी यांचा सुरेख मिलाफ असतो. जादूच्या प्रत्येक प्रयोगामागे विज्ञान आहे. जादूकडे करमणूक म्हणूनच पाहावे, असे आवाहन उपस्थित बालचमूंना जादूगार विश्वसम्राट यांनी याप्रसंगी केले.शेवटचे काहीच दिवसबाल विकास मंचच्या सबस्क्रिप्शनच्या नोंदणीसाठी शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहेत. नोंदणी करून २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘फन फेअर’चा आनंद पालकांनी व मुलांनी घ्यावा. नोंदणी लोकमत कार्यालयात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू आहे.सभागृह हाऊसफुल्लदुपारी चार वाजता जादूचा विशेष प्रयोग सुरू होणार असला तरी साडेतीन वाजताच सभागृह हाऊसफुल्ल झाले.यावेळी पालकांच्या मुलांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले.