बेळगाव : बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महाराष्टÑ एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी बेळगावातील वॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी महाराष्टÑातील नेत्यांना प्रवेशबंदी होती. ही बंदी झुगारून माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील हे चौघेजण गनिमीकाव्याने बेळगावात आले. या सर्वांनी महामेळाव्यात सहभाग घेऊन सीमावासीयांना महाराष्टÑाचा पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, प्रवेशबंदी आदेश झुगारुन मेळाव्यात सहभागी झाल्याप्रकरणी जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, बेळगावचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, नगरसेवक अनंत देशपांडे, बिदरचे रामभाऊ राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद केले असले तरी अद्याप आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया समिती नेत्यांकडून देण्यात आली आहे.पोलिसांची आकसाने कारवाई: मरगाळेलोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले आहे. सोमवारचा महामेळावा यशस्वी झाल्याने पोटशूळ उठल्याने पोलिसांनी आकसाने कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे यांच्यावर गुन्हेजयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील यांच्यासह १४ जण.
महाडिक, कुपेकर, के.पीं.वर गुन्हा : कर्नाटकची पुन्हा मुजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:03 AM
बेळगाव : बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने
ठळक मुद्देबेळगावातील महामेळाव्यात सहभाग महाराष्टÑातील नेत्यांना प्रवेशबंदी