कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून लढलेल्या शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह १५ उमेदवारांचा खर्च अंतिम झाला असून, तो ७० लाखांच्या आत झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांच्यासह १७ उमेदवारांचा खर्च ही ७० लाखांच्या आत झाला आहे. या अंतिम आकडेवारीचा अहवाल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सहीने सोमवारी भारत निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला.‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, ‘हातकणंगले’चे उमेदवार राजू शेट्टी, धैर्यशील माने, अस्लम सय्यद यांच्या खर्चात तफावत होती. त्यांना खर्चाचे अंतिम लेखे सादर करण्याची मुदत २२ जूनपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार वरील उमेदवारांनी २१ व २२ जूनला निवडणूक खर्च निरीक्षकांकडे आपले खर्चाचे अंतिम लेखे सादर केले. ते निवडणूक खर्च निरीक्षकांच्या खर्चाशी जुळले. त्यानुसार या उमेदवारांचा खर्च हा ७० लाख खर्च मर्यादेच्या आतील आहे.
यामध्ये संजय मंडलिक यांचा खर्च ६७ लाख ५१ हजार ३९९ रुपये, धनंजय महाडिक यांचा खर्च ६६ लाख ९७ हजार १०७ रुपये, राजू शेट्टी यांचा ६९ लाख २ हजार ६०७ रुपये, धैर्यशील माने यांचा ६६ लाख ८४ हजार ५०८ रुपये, अस्लम सय्यद यांचा १२ लाख ५ हजार ६५६ रुपये खर्च झाला आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांनी १८ जूनपर्यंत आपले खर्चाचे लेखे सादर केले असून, ते निवडणूक निरीक्षकांच्या खर्चाशी जुळले आहेत.सोमवारी सायंकाळी सर्व उमेदवारांच्या खर्चाचा अंतिम अहवाल दोन्ही मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक व जिल्हाधिकारी देसाई यांच्या सहीने आॅनलाईनद्वारे अपलोड करून भारत निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला.उमेदवारांचा झालेला खर्च असाकोल्हापूर मतदारसंघ
उमेदवार पक्ष खर्चसंजय मंडलिक शिवसेना ६७ लाख ५१ हजार ३९९धनंजय महाडिक राष्ट्रवादी कॉँग्रेस ६६ लाख ९७ हजार १०७अरुणा माळी वंचित बहुजन आघाडी ८ लाख १ हजार ७२७दुंडाप्पा श्रीकांत बहुजन समाज पार्टी १ लाख २० हजार २१०किसन काटकर बळीराजा पार्टी ४९ हजार ९९५सिद्धार्थ नागरत्न बहुजन मुक्ती पार्टी १ लाख ७१ हजार ४३५दयानंद कांबळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी १ लाख ९२ हजार ९०९बाजीराव नाईक अपक्ष ६४ हजार ८००संदीप संकपाळ अपक्ष १ लाख ३० हजार ६२४परेश भोसले अपक्ष २ लाख ७३ हजार ५३१संदीप कोगले अपक्ष २२ हजार ६५५युवराज देसाई अपक्ष १ लाख ३२ हजार २२९मुश्ताक मुल्ला अपक्ष ९४ हजार ३७२अरविंद माने अपक्ष १४ हजार ३०राजेंद्र कोळी अपक्ष ५५ हजार १७३
हातकणंगले मतदारसंघउमेदवार पक्ष खर्चधैर्यशील माने शिवसेना ६६ लाख ८४ हजार ५०८राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष ६९ लाख २ हजार ६०७राजू मुझिकराव शेट्टी बहुजन महा पार्टी १ लाख १२ हजार १७५अस्लम सय्यद वंचित बहुजन आघाडी १२ लाख ५ हजार ६५६प्रशांत गंगावणे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी १७ हजार९२०अजय कुरणे बहुजन समाज पार्टी ५४ हजार ६६६मदन कांबळे (सरदार) बहुजन मुक्ती पार्टी ४१ हजार ४४७आनंदराव सरनाईक अपक्ष ३ लाख २७ हजार ८६८संजय अग्रवाल अपक्ष ९१ हजार ३८०किशोर पन्हाळकर अपक्ष २५ हजार ७२०महादेव जगदाळे अपक्ष ६६ हजार ८२२रघुनाथ पाटील अपक्ष ४ लाख २२ हजार ६९२संग्रामसिंह गायकवाड अपक्ष ४३ हजार३९२विश्वास कांबळे अपक्ष २३ हजार ६४०विजय चौगुले अपक्ष ५५ हजार ८६५विद्यासागर ऐतवडे अपक्ष २५ हजार ८१३नितीन भाट अपक्ष ७८ हजार ९५५उमेदवारांच्या खर्चात देणगी अन पक्षनिधीचा समावेश ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलिक यांच्या एकूण खर्चात ४० लाख रुपये त्यांच्या पक्षाकडून आले आहेत, तर १२ लाख ९४ हजार रुपये हे देणगी स्वरूपात आले आहेत, असे नोंदविले आहे. धनंजय महाडिक यांच्या एकूण खर्चात ६० लाख रुपये त्यांच्या पक्षाकडून आल्याचे म्हटले आहे. अरुणा माळी यांच्या एकूण खर्चात पाच लाख २५ हजार हे देणगी स्वरूपातील असल्याचे म्हटले आहे. ‘हातकणंगले’ मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या एकूण खर्चात ४० लाख रुपये हे त्यांच्या पक्षाकडून व १२ लाख ८० हजार हे देणगी स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. राजू शेट्टी यांच्या एकूण खर्चात ३७ लाख रुपये पक्षाकडून मिळाल्याचे म्हटले आहे. अस्लम सय्यद यांच्या एकूण खर्चात १२ लाख ३७ हजार ९०० रुपये देणगी स्वरूपात असल्याचे म्हटले आहे.