लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरही खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील अंतर कायम राहिले. दोघांनीही काहीवेळ एकमेकांना चिमटे काढले; पण त्यांच्यातील निर्माण झालेले अंतर लक्षात घेता, अनेक वेळा पवार यांच्यावरच त्यांना ‘जुळवून घेण्या’चा वारंवार सल्ला देण्याची वेळ आली.कोल्हापूर जिल्ह्णाच्या राजकारणात खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्यात दुरावा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी कोल्हापूर जिल्ह्णाच्या दौऱ्यावर होते. यावेळी महाडिक आणि मुश्रीफ हे दोघे समोरासमोर येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सकाळी नऊ वाजता पवार व माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी असा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहावर नियोजित होता. पवार मध्यरात्रीच येथे पोहोचल्याचे समजताच कार्यकर्त्यांच्या अगोदर खासदार महाडिक सकाळी सव्वाआठ वाजता त्यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृहावर आले, तर पाठोपाठ आमदार मुश्रीफ हेही तेथे आले. महाडिक-मुश्रीफ बंद कक्षातशासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असतानाच मुश्रीफ- महाडिक यांच्यातील दुरावा प्रकर्षाने जाणवत होता. त्यावेळी पवार यांनीच, ‘यांचं एकदा मिटवायला लागतंय’ असे म्हणत दोघांनाही विशेष कक्षात थांबण्याची विनंती केली. त्यावेळी महाडिक आणि मुश्रीफ हे दोघेही विशेष कक्षात जाऊन सुमारे १५ मिनिटे थांबले. त्यावेळी बंद कक्षात त्यांच्यात काय चर्चा झाली हे मात्र कळु शकले नाहीकोणाचं काय चाललंय समजेना!शासकीय विश्रामगृहावर अजित पवार हे कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारत असताना, हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक हे दोघे दोन्ही बाजूंना दुरावा ठेवूनच होेते. त्यात कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने मुश्रीफ वारंवार बाहेर जाऊ लागले. हे वातावरण पाहता पवारच म्हणाले, ‘कोणाचं काय चाललंय तेच समजेना!
महाडिक-मुश्रीफांचे चिमटे अन् दादांची तारांबळ
By admin | Published: July 03, 2017 12:53 AM