कोल्हापूर : ज्यांनी ज्यांनी महाडिक कुटुंबाला मदत केली, त्यांच्यासाठी महाडिक, सगळे घरदार जुगार लावतो. सगळे संपले तरी चालेल, पण दिलेला शब्द पाळतो, ही आमच्या राजकारणाची पद्धत आहे. माझे राजकारण ‘काख हात लांब आणि काख हात रूंद’ असल्याने त्यातून कोणी सुटत नाही, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत महादेवराव महाडिक यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘माझ्या भाजप प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. भाजप प्रवेशाची सुरुवात माझ्यापासूनच झाली.
सून (शौमिका महाडिक) भाजप तिकीटावर जिल्हा परिषदेला निवडून आल्या आणि अध्यक्षा झाल्या. मुलगा (अमल) भाजपचा आमदार आहे, त्याच वेळी मी कोठे आहे, हे ओळखायला पाहिजे होते. भाजप प्रवेशाच्या पुढे आपले राजकारण गेले आहे. आतापर्यंत मुरवून राजकारण खाल्ले आहे. मुलग्याला १५ दिवसांत आमदार करण्याचे काम येथील जनतेने केले.कोल्हापूरच्या जनतेने भरपूर दिले, त्यांची सेवा करतच राहणार आहे. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, त्यांच्यासाठी महाडिक जुगाराला लावून सगळे डाव खेळत असतो. जे काय मिळाले ते जनतेच्या पुण्याईने मिळाले. महाडिकांनी एकदा शब्द दिला, की सगळे संपले तरी चालेल; पण त्यावर ठाम राहतो, असेही महाडिक यांनी सांगितले.भाजप-सेनेकडे शिवरायांची रणनीतीछत्रपती शिवाजी महाराज यांनी अंतर्मनातील शक्तीने माणसे ओळखल्याने त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्याच रणनीतीचे अनुकरण भाजप व शिवसेना करत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.