शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Mahadevrao Mahadik: देव संकटात आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल - महादेवराव महाडिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 1:30 PM

कोणी मला काही म्हणो मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील राजकीय नाट्य घडामोडीनंतर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. याविजयानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे महाडिक गटाला पुन्हा बळ मिळाले आहे. यासर्व घडामोडीतच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली.ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात महादेवराव महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. इतकच नाही तर, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत पुढील राजकारणाचे संकेतच दिले.महाडिक म्हणाले, जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकांना कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही असे ते म्हणाले.राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केलं नाहीकोल्हापूर जिल्ह्यानं भरभरुन दिलं आहे, जनतेनं खूप प्रेम दिलं आहे. राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केलं नाही. स्वतःचे धंदे सांभाळून मी राजकारण केलं. मी जे पेरले ते उगवून येत आहे. जनतेनं मला दीर्घायुष्य दिलं आहे, जनतेने मला दिले, मी जनतेला देत राहीन असेही ते म्हणाले.पालकमंत्री सतेज पाटीलांना टोलामहादेवराव महाडिक यांनी लक्ष्मण रेषा मारायला हवी असे म्हणत पालकमंत्री सतेज पाटील यांना टोला लगावला. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते, माणसाने राजकारण लक्ष्मण रेषा मारली पाहिजे असे महाडिक म्हणाले. जिल्ह्याच्या रणामध्ये महाडिक कायम असणार आहे. कोणी मला काही म्हणो मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक