शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Lok Sabha Election 2019 शहरात जोडण्या लावताना महाडिकांची दमछाक : विरोधातील नगरसेवकांच्या प्रभागांत पर्यायी फौज उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:41 PM

राष्टवादी कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून विरोधाचे घाव झेलणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या काही दिवसांत कोल्हापूर शहरात बºयाच जोडण्या लावून विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे महापालिकेतीलनगरसेवक विरोधात काम करीत असतानाच त्याच नगरसेवकांच्या विरोधातील

ठळक मुद्देमात्र त्यांना कॉँग्रेसच्या २९ नगरसेवकांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. शिवसेनेची ही जमेची बाजू आहे.

कोल्हापूर : राष्टवादी कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून विरोधाचे घाव झेलणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या काही दिवसांत कोल्हापूर शहरात बºयाच जोडण्या लावून विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे महापालिकेतीलनगरसेवक विरोधात काम करीत असतानाच त्याच नगरसेवकांच्या विरोधातील अन्य सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांना प्रचारात सहभागी करून महाडिक यशस्वी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. शहरातील पदयात्रांना मिळालेला प्रतिसाद महाडिक यांना एकतर्फी विरोध नसल्याचे स्पष्ट करतो. जवळपास ४० ते ४१ नगरसेवक त्यांच्या बाजूने प्रचार करण्यास मैदानात उतरले आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यास पक्षातून विरोध झाला; परंतु राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाडिक यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे राष्टवादीतील नेते शांत झाले, पक्षादेश मानून कामाला लागले. मात्र ‘आमचं ठरलंय’चे प्रमुख सूत्रधार आमदार सतेज पाटील हे नरमाईचे धोरण न स्वीकारता उलट तीव्र विरोध करीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतील कॉँग्रेसच्या ३१ नगरसेवकांपैकी एक-दोन अपवाद वगळता सर्वच नगरसेवक आजही थेट महाडिकांच्या विरोधात काम करीत आहेत. याबाबत राष्टवादी तसेच कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना, आदेश देऊनही आमदार पाटील यांनी आपली भूमिका बदललेली नाही.

कॉँग्रेसचे ३१ पैकी जवळपास २९ नगरसेवक थेट शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. इच्छा असो अथवा नसो; आपले नेते आमदार पाटील यांनी सांगितलंय म्हणून मंडलिक यांचा प्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. शहर परिसरात निघालेल्या पदयात्रेत हेच नगरसेवक आघाडीवर दिसत होते. कॉँग्रेसचे गटनेते व स्थायी सभापती शारंगधर देशमुख हे कॉँग्रेसच्या नगरसेवकांचे नेतृत्व करीत आहेत. महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेचे केवळ चार नगरसेवक आहेत. मात्र त्यांना कॉँग्रेसच्या २९ नगरसेवकांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. शिवसेनेची ही जमेची बाजू आहे.आमचं ठरलंय चा धसका‘आमचं ठरलंय’मुळे महाडिक यांना आपली रणनीती बदलावी लागली. जे आपल्यासोबत येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत, त्यांना वगळून पुढे जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. ज्या प्रभागातील नगरसेवक आपल्या विरोधात आहेत, त्या प्रभागातील त्यांच्याविरोधात महापालिकेची निवडणूक लढलेल्या अन्य कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले आहे. काही प्रभागांत आपल्या विरोधातील लोक प्रचारात सहभागी झाल्यामुळे काही नगरसेवक प्रचारापासून लांब आहेत; परंतु तेथेही खुबीने परिस्थिती हाताळताना महाडिक गटाची दमछाक होताना दिसते.महापौरांसह चौघे प्रचारापासून लांबचराष्टÑवादी कॉँग्रेसच्या महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ‘आपण धनंजय महाडिक यांचा प्रचार करणार नाही,’ असे स्पष्ट केले होते. त्यांच्यासह नगरसेविका सूरमंजिरी लाटकर व त्यांचे पती राजेश लाटकर, नगरसेविका अनुराधा खेडेकर व त्यांचे पती सचिन खेडेकर, माधुरी गवंडी व त्यांचे पती प्रकाश गवंडी यांनीही तसेच सांगितले होते. मात्र गवंडी पती-पत्नी वगळता मोरे, लाटकर, खेडेकर आजही प्रचारात दिसत नाहीत. महापौर मोरे यांच्या सासूंचे निधन झाले असल्याने त्या आता बाहेर पडणार नाहीत. 

कदम बंधूंची व्यूहरचनामहाडिक यांचे नातेवाईक असलेल्या नगरसेवक सत्यजित कदम व सुनील कदम यांनी शहरातील कसबा बावडा, लाईन बझार, विचारेमाळ, सदर बझार, जाधववाडी, भोसलेवाडी, कदमवाडी या परिसराची जबाबदारी स्वीकारलेली आहे. कसबा बावडा व लाईन बझार हा आमदार पाटील यांचा प्रभाव असलेला भाग असल्याने कदम बंधूंनी तेथे जोर लावलेला आहे.जयंत पाटील यांची जोरदार फिल्डिंगनिवडणूक व्यवस्थापनात पारंगत असलेल्या प्रा. जयंत पाटील यांनी महाडिक यांच्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील जोडण्या लावण्यात महाडिक गटाचे जे काही विश्वासू कार्यकर्ते आहेत, त्यांत प्रा. पाटील आघाडीवर आहेत. जेथे आपणाला नगरसेवकांचे सहकार्य मिळत नाही, त्या प्रभागात त्या नगरसेवकांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांची ताकद महाडिक यांच्या पाठीशी उभी करण्यात प्रा. पाटील यांनी प्रयत्न केले असून, त्यात त्यांना यशही आले आहे. काही भागांत एकमेकांचे विरोधक असलेल्या गटांना स्वतंत्रपणे हाताळताना त्यांनी कौशल्य पणाला लावले आहे.क्षीरसागर, पवार, जाधव सेनेचे शिलेदारशिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी शहरात आमदार राजेश क्षीरसागर, संजय पवार, महेश जाधव यांनी उचललेली आहे. भाग आणि भाग त्यांनी पिंजून काढलेला आहे. त्यांना आमदार सतेज पाटील यांची फौज मिळाली असल्याने त्यांचा शिवसेना व भाजपचा प्रचाराचा भाग थोडा हलका झालेला आहे.कोणाच्या मागे किती नगरसेवकपक्षाचे नगरसेवक धनंजय महाडिक संजय मंडलिककॉँग्रेस ०२ २९राष्टवादी १० ०४ताराराणी आघाडी १९ ००भाजप ०९ ०३शिवसेना ०० ०४-----------------------------------------------------एकूण - ४१ ४०------------------------- 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर