शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आघाडीत महाडिकांचा सिंहाचा वाटा असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2016 1:06 AM

धनंजय महाडिक : पालिका निवडणुकीचे रणशिंग फुं कले

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहराच्या राजकीय, सामाजिक विकासात डांगे यांचे योगदान आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत त्यांच्या आघाडीत महाडिकांचा सिंहाचा वाटा असेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी करून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. येथील शिकलगार वसाहतीतील शिकलगार समाज सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. प्रारंभी महाडिक यांच्या हस्ते सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी करण्यात आला. खासदार महाडिक म्हणाले, राजकारणातील भ्रष्ट नीतीमुळे नेते बदनाम होत आहेत. मात्र, महाडिक स्वत:च्या खिशातील पैसा वापरून सामाजिक उपक्रम राबवित असतात. संपूर्ण जिल्ह्यात धनंजय महाडिक युवा शक्ती सक्रिय असून, शंभर टक्के सामाजिक कार्यात असतात. शिकलगार समाजाला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी रामचंद्र डांगे यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असून, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आमदार उल्हास पाटील म्हणाले, या सांस्कृतिक भवनासाठी आमदार फंडातून मदत करण्यात येईल. मात्र, या उपेक्षित समाजाने शिक्षणाला महत्त्व देऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव निंबाळकर, माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास नगराध्यक्ष विमल जोंग, रामभाऊ मधाळे, रवी गायकवाड, अजय भोसले, सलीम दबासे, जोतीराम जाधव, उदय डांगे, अनुप मधाळे, पंडित देसाई, अनिल शिकलगार, राजू निर्मळे, प्रथमेश गायकवाड, आप्पासो मोहिते, किरण जोंग, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक युवराज शिकलगार यांनी केले. (वार्ताहर)