शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

‘महागाव’ला ५४ वर्षांनंतर मिळणार ‘सभापतिपद’ गडहिंग्लज पंचायत समिती : तपानंतर शिप्पूरला उपसभापतिपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:48 PM

राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असणाऱ्या महागावला यावेळी तब्बल ५४ वर्षांनंतर सभापती पद मिळणार आहे.

राम मगदूम ।गडहिंग्लज : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असणाऱ्या महागावला यावेळी तब्बल ५४ वर्षांनंतर सभापती पद मिळणार आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंगत शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील यांच्यानंतर सभापती होण्याचा बहुमान त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजयराव पाटील यांना मिळणार आहे. तसेच शिप्पूर तर्फ नेसरी या गावालाही तब्बल एक तपानंतर उपसभापतिपद मिळणार आहे. माजी उपसभापती आनंदराव मटकर यांच्यानंतर युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विद्याधर बाबूराव गुरबे यांना ही संधी मिळणार आहे. १८ सप्टेंबरच्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

१ मे १९६२ ला गडहिंग्लज पंचायत समितीची स्थापना झाली. त्यावेळी तालुक्यावर काँगे्रसचे आणि तत्कालीन जिल्ह्याचे नेते देशभक्तरत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मोठा प्रभाव होता. स्व. शिवगोंडराव हे त्यांचे अनुयायी होते. त्यांचे नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्य विचारात घेऊनच तत्कालीन नेत्यांनी त्यांना सभापतिपदाची संधी दिली, त्यांनी ती लीलया पेलली. त्यानंतर आजतागायत सभापतिपदाची संधी महागावला मिळालेली नव्हती; परंतु योगायोगाने स्व. शिवगोंडराव यांचे सुपुत्र विजयराव यांच्या रूपाने सभापतिपदाचा मान यावेळी पुन्हा महागावला मिळणार आहे.१९६२ ते १९६४ अखेर शिवगोंडराव हे सभापती होते. त्यानंतर उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांचे सख्खे बंधू वीरगोंडराव यांनी तब्बल ११ वर्षे उपसभापती म्हणून काम केले.

तद्नंतर वीरगोंडराव यांचे सुपुत्र विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांना २००२ ते २००५ अखेर उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.दरम्यान, २००५ मध्ये अप्पी पाटील यांना जिल्हा परिषदेवरकाम करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी अ‍ॅड. हणमंतराव पाटील यांनीही जिल्हा परिषदेवर महागावचे प्रतिनिधित्व केले; परंतु सभापतिपदाचा बहुमान स्व. शिवगोंडराव यांच्याखेरीज गावात कुणालाही मिळालेला नव्हता.

दीड वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत स्व. शिवगोंडराव यांचे सुपुत्र विजयराव हे ताराराणी आघाडीतर्फे निवडून आले. त्यावेळी पहिल्या टप्प्यातच त्यांना सभापतिपदाची संधी देण्याचे वचन नेत्यांनी दिले होते. त्याचे पालन झाले नाही म्हणूनच त्यांनी मावळत्या सभापती जयश्री तेली यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला; परंतु तेली यांनी राजीनामा दिल्यामुळे विजयराव यांच्या सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.‘बाबां’नंतर ‘तार्इं’मुळे बहुमान..!२००२ ते २००५ या कालावधीत स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी अप्पी पाटील यांना उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली होती. यावेळी त्यांचे सख्खे चुलत बंधू विजयराव यांना सभापतिपदाचा बहुमान मिळणार आहे. त्यासाठीस्व. कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सध्या अप्पी पाटील राष्ट्रवादीसोबत नसतानाही दीड वर्षापूर्वी केलेली भाजपसोबतची आघाडी तोडली आहे.महागावला मिळालेले सन्मानशिवगोंडराव आण्णासाहेब पाटील (सभापती, १९६२-६७)शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील (उपसभापती, १९६७-७३)वीरगोंडराव आण्णासाहेब पाटील (उपसभापती, १९७९-९०)विनायक वीरगोंडराव पाटील (उपसभापती, २००२-०५)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण