शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

महाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 3:31 PM

राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठकयात्रेच्या निमित्ताने संघटित शक्ती दाखवा: हाळवणकर

कोल्हापूर : राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.महाजनादेश यात्रेच्या स्वागताबरोबरच तयारीसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू हॉल येथे भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थावरून बोलत होते. प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटनमंत्री बाबा देसाई, सरचिटणीस विजय जाधव आदींची होती.आमदार हाळवणकर यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा यशस्वी होईल, यात शंका नाही; त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या तालुकानिहाय कामकाजाच्या वेळापत्रकानुसार काम करावे, असे सांगितले.महेश जाधव यांनी शहरात ही यात्रा येत असून, शहरातील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक, बूथ प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने यात्रा मार्गावर उपस्थित जोरदार स्वागत करावे, अशा सूचना दिल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ही यात्रा वेगळी करण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.राहुल चिकोडे म्हणाले, ‘यात्रेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांने कोणती जबाबदारी पार पाडायची हे सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे तयारी करावी,’ असे सांगितले. बाबा देसाई यांनी यात्रेसाठी जिल्ह्यातून उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या सहभागाच्या संख्येचा आढावा घेऊन त्याची नोंद घेतली.यावेळी पी. जी. शिंदे, के. एस. चौगुले, आर. डी. पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, जयश्री जाधव, संतोष भिवटे, अजिंक्य चव्हाण, मारुती भागोजी, गणेश देसाई, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, सुरेश जरग, विजय आगरवाल, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, आदी उपस्थित होते.यात्रा मार्गावर झेंडे, फलक लावून वातावरण निर्मितीभाजपातर्फे यात्रा मार्गावर ध्वज, बोर्ड लावून वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले, तसेच सर्वांनी ही यात्रा नेटक्या नियोजनाद्वारे वेळापत्रकानुसार पार पाडावी, असे आवाहनही केले. 

 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाkolhapurकोल्हापूरSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर