गडहिंग्लज : पालकमंत्र्यांशी चर्चा करून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून गडहिंग्लजच्या महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी दिली.लोकवर्गणीतून श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त शहरात ३१ ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, स्थानिक प्रशासन व यात्रा समितीच्या सहकार्याने यात्रेची पूर्वतयारी उत्तमरीत्या झाली आहे. अनेक गोष्टी झाल्या तरी काही छोट्या गोष्टी राहून जातात. संयम बाळगा, यात्रा शांततेत पार पाडा. यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील.यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, डीवायएसपी डॉ. सागर पाटील, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, मुख्याधिकारी तानाजी नरळे, खातेदार यशवंत पाटील, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, डॉ. बी. एस. पाटील, विठ्ठल भमानगोळ, अमरनाथ घुगरी, आण्णासाहेब देवगोंडा, आदींसह यात्रा समिती सदस्य, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांचा सत्कार यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे यांच्या हस्त,े तर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा यांचा सत्कार दत्ता बरगे यांच्या हस्ते झाला. बसवराज आजरी यांनी स्वागत, तर चंद्रकांत सावंत यांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. सुनील चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण महालक्ष्मी यात्रेनिमित्त लोकवर्गणीतून बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा यात्रेनंतर पोलीस खात्याला लोकार्पण करणारे गडहिंग्लज शहर हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण आहे, या शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी गडहिंग्लजकरांचा गौरव केला.
महालक्ष्मी मंदिर परिसर विकासाला निधी देणार
By admin | Published: April 29, 2015 9:55 PM