शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
"पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या ट्रूडो सरकारला खडसावले!
3
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
4
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
6
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
7
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
8
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
9
Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल
10
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
11
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
12
जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...
13
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
14
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
15
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
16
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
17
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
18
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
19
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
20
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?

पाणी संस्थांना महावितरणच्या ‘इंंधन अधिभार’चा झटका

By admin | Published: August 13, 2015 12:15 AM

वीज आकार एवढा इंधन आकार : स्थिर आकारातूनही होतेय लूट; जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्था टिकणार काय?

प्रकाश पाटील - कोपार्डे  वाकरे (ता. करवीर) येथे केदारलिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेने डिसेंबर २०१४ पासून वापरलेल्या वीज आकारावर लावलेला वाढता इंधन अधिभार सचिवांनी संचालक मंडळाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा सौदा’ अशीच महावितरणच्या वसुलीच्या बाबतीत स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाणीपुरवठा संस्था कशी चालवायची, हा यक्षप्रश्न आहे. ही एकाच संस्थेबद्दलची महावितरणची आकारणी नसून, सर्वच संस्थांच्या बाबतीत असल्याने जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्था टिकणार काय? हा प्रश्न आहे. केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीवर पाणी उपशासाठी विद्युत मोटार बसविली. नंतर त्यांना वीज आकार २१ हजार ७४४, तर इंधन आकार ७ हजार ३८९ रुपये आला. नोव्हेंबरमध्ये वीज आकार ३१ हजार १४५, तर इंधन आकार ४ हजार ७५४ रुपये आला. यानंतर इंधन आकारात मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्ये वीज आकार १९ हजार ९७ तर इंधन अधिभार १४ हजार २६०, जानेवारीमध्ये वीज आकार ४३ हजार २१९ तर इंधन अधिभार २२ हजार ८१४, तर एप्रिलमध्ये वीज आकार ३३ हजार ६९५ तर इंधन अधिभार २६ हजार ९८२ रुपये आकारण्यात आला. या महिन्यात ५७ रुपये ६ पैसे प्रतियुनिट इंधन अधिभार बसत असल्याने संस्था चालवायच्या कशा, असा प्रश्न या संस्थाचालकांना पडला आहे.यावर्षी सुरुवातीपासून इंधन अधिभार, इतर आकार, मीटर रिडिंगपेक्षा जादा वीज आकार कळवून बिल देणे असे प्रकार सर्रास चालू आहेत. हे जिल्ह्यातील सर्वच पाणीपुरवठा संस्थांच्या बाबतीत महावितरणकडून चालू आहे. आमच्या सचिवांमुळे आमच्या हे लक्षात आले आहे. मात्र, विचारणा केल्यास दाद दिली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा संस्था टिकणे अवघड आहे.- सुभाष महादेव पाटील, अध्यक्ष केदारलिंग पाणीपुरवठा, वाकरेकर्मचाऱ्यांकडून दखल नाहीडिस्प्ले गेला होता म्हणून जानेवारीत मीटर महावितरणने बदलले. यावेळी मीटरप्रमाणे २१ हजार ८७५ युनिट वीज वापर झाल्याप्रमाणे १५ हजार ७३४ रुपयांचे बिल दिले होते. मात्र, याच बिलात पुन्हा ३८ हजार २११ युनिट जादा वीज वापर दाखवून संस्थेला २७ हजार ४८५ रुपये वीज आकार भरण्यास सांगितले. त्याशिवाय इंधन अधिभार २२ हजार ८१४ रुपये आकारण्यात आला होता. अशी मनमानी आकारणी करून या पाणीपुरवठा संस्था आर्थिक अडचणीतच ढकलल्याचा आरोप सचिव संजय कुंभार यांनी केला. ही जादाची आकारणी का? मीटर रिडिंगप्रमाणे आमचे बिल घ्या, अशी विचारणा केल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दाद घेतली जात नाही, असेही कुंभार यांनी सांगितले.मीटर काढून घ्यावे'नोव्हेंबर महिन्यात मीटरचा डिस्प्ले गेला होता. यावेळी महावितरणकडून सरासरी वीज वापर इतका २५ हजार ७५० युनिट वापर कळविला. त्यापोटी १८ हजार ५२१ रुपये आकारणी बरोबर १७ हजार ५५० युनिट तुम्ही जादा वापर केला असल्याचे कळवत १२ हजार ६२३ रुपये त्याच बिलात आकारणी केली. याबाबत संस्थेला कोणतीही कल्पना दिली नाही. संस्थेने मात्र पावसाळा जवळ आल्याने मीटर काढून घ्यावे, अन्यथा खराब होण्याची भीती लेखी कळविली होती.