शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

एकदाच आमदार...कुठे गेले वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यात 'यांना' मिळाली एकदाच आमदारकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 3:52 PM

कोल्हापूर : राजकारणात पद, प्रतिष्ठा व वलय असल्याने एकदा राजकीय हवा लागली की सहजासहजी माणूस त्या हवेपासून दूर जात ...

कोल्हापूर : राजकारणात पद, प्रतिष्ठा व वलय असल्याने एकदा राजकीय हवा लागली की सहजासहजी माणूस त्या हवेपासून दूर जात नाही. सातत्याने यशाची अपेक्षा ठेवणारा नेता आपल्या पुढच्या पिढीचीही सोय लावण्यासाठी धडपडत असतो. घरात एकदा आमदारकी मिळाली की पुढच्या पिढ्यांनाही जनतेने स्वीकारावे अशी अपेक्षा ठेवणारे नेते असंख्य आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १६ जणांना एकदाच आमदारकी मिळाली आहे. यातील काहीजणांनी पुढे निवडणूक लढविली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एकदाच आमदारकीची संधी मिळालेल्या नेत्यांचे काही वारसदार पूर्वजांचा वारसा सांगत राजकारणात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काहीजण राजकीय पटलावरून कायमचे बाहेर गेले आहेत.

राधानगरीत कडव, भोईटे, शंकर धोंडी यांना एकदाच आमदारकीराधानगरी मतदारसंघातून हरिभाऊ कडव १९८० मध्ये विधानसभेवर गेले होते. त्यांच्या माघारी मुलगा ॲड. संग्राम कडव यांनी राजकारणाऐवजी वकिली व्यवसाय निवडला. १९९५ मध्ये याच मतदारसंघातून नामदेवराव भोईटे आमदार झाले होते. त्यांचे चिरंजीव उमेश भोईटे हे वारके येथील हुतात्मा स्वामी सूतगिरणीचे अध्यक्ष, दुसरा मुलगा महेश हे पालकरवाडीचे सरपंच आहेत. याच मतदारसंघातून १९७२ मध्ये किसनराव मोरे अपक्ष विजयी झाले होते. त्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय आहे. १९९० मध्ये शंकर धोंडी पाटील यांनी जनता दलाकडून गुलाल उधळला होता. त्यांचे चिरंजीव वसंतराव पाटील राधानगरी शेतकरी संघाचे संचालक आहेत. १९६२ मध्ये ज्ञानदेव खांडेकर यांनाही एकदाच आमदारकी मिळाली.

देसाई, पाटील यांचे वारसदार अलिप्तचंदगडमध्ये १९७२ च्या निवडणुकीत वसंतराव देसाई व १९७८ च्या निवडणुकीत विठ्ठलराव भैरू पाटील यांनी विजय मिळविला होता. या दोघांचेही वारस राजकारणात सक्रिय नाहीत. १९९५ च्या निवडणुकीत भरमू पाटील यांनाही एकदाच आमदारकी मिळाली. गडहिंग्लज मतदारसंघाचे पहिले आमदार महादेव श्रेष्टी यांचे वारसदार राजकीय पटलावरून दूर आहेत, तर १९६२ ला आमदारकी मिळालेले अप्पासाहेब नलवडे यांचे चिरंजीव संग्रामसिंह हेही तितकेसे सक्रिय नाहीत. १९६७ मध्ये तुकाराम कोलेकर यांनी विजय मिळविला होता. त्यांचे चिरंजीव हेमंत कोलेकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

यांना मिळाली एकदाच आमदारकी

  • राधानगरी : हरिभाऊ कडव, नामदेवराव भोईटे, दिनकरराव जाधव, किसनराव मोरे, ज्ञानदेव खांडेकर, दिनकरराव जाधव.
  • चंदगड-गडहिंग्लज : वसंतराव देसाई, विठ्ठल पाटील, महादेव श्रेष्टी, अप्पासाहेब नलवडे, तुकाराम कोलेकर, भरमू पाटील. बी. एस. पाटील.
  • इचलकरंजी-हातकणंगले-वडगाव : के. एल. मलाबादे, एस. पी. पाटील, बी. बी. खंजिरे. नानासाहेब माने, नामदेव व्हटकर,
  • शिरोळ : दिनकरराव यादव, सरोजिनी खंजिरे
  • पन्हाळा-शाहूवाडी: एस. डी. पाटील, आर. डी. पाटील.
  • सांगरूळ-करवीर : दिनकरराव मुद्राळे, आर. बी. पाटील.
  • कोल्हापूर : लालासाहेब यादव, रवींद्र सबनीस, एन. डी. पाटील, दिलीप देसाई, चंद्रकांत जाधव.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkarvir-acकरवीरradhanagari-acराधानगरीshahuwadi-acशाहूवाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024