शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोल्हापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघांत १८६ तृतीयपंथी मतदार; सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 4:25 PM

मतदान केंद्रावर यंदा दिव्यांग, ज्येष्ठांसाठीही स्वतंत्र रांग

कोल्हापूर : मतदान केंद्रावर महिला आणि पुरुष अशा दोन स्वतंत्र रांगा असतात. यंदा दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठीही स्वतंत्र रांग असेल. परंतु, तृतीयपंथी मतदार कोणत्या रांगेत उभा राहणार, यावर निवडणूक विभागाने त्यांना थेट प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय या मतदाराचा सत्कारही करण्यात येणार आहे.सर्वाधिक तृतीयपंथी मतदार या मतदारसंघातकोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८६ तृतीयपंथीय मतदार आहेत. यापैकी इचलकरंजी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६२ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर दक्षिणमध्ये ५१ मतदार आहेत.१० मतदारसंघांत १८६ तृतीयपंथी मतदारमतदारसंघ - संख्याइचलकरंजी - ६२कोल्हापूर दक्षिण - ५१हातकणंगले - २०कोल्हापूर उत्तर - १८राधानगरी - १२चंदगड - ०९शाहूवाडी - ०७कागल - ०५शिरोळ - ०२करवीर - ००

तृतीयपंथी नावनोंदणीत उदासीन का?अनेक वर्षांपासून तृतीयपंथी या उपेक्षित घटकाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन चेष्टेचा राहिला आहे. त्यामुळे अनेकजण मतदान करणे टाळत. मतदानासाठी गेलेच तर हेटाळणी होते, सामान्य रांगेत खूपवेळ थांबवून ठेवले जाई. चेष्टा करणे, हिणवले गेल्याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे कोल्हापुरातील मैत्री संघटनेच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर थेट प्रवेश देण्याची मागणी केली. त्याला आयोगाने मान्यता दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी सांगितले.

लोकसभेत ४४ जणांनी केले मतदानलोकसभेला जिल्ह्यातील दोन मतदारसंघात ४४ तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. कोल्हापूर मतदारसंघात २१.५ तर हातकणंगले मतदारसंघात २६.८७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.नावनोंदणीत ‘इतर’ असा पर्याय; रांगा दोनच का?तृतीयपंथीयांच्या मागणीनुसार न्यायालयानेही त्यांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंद घेतली. त्यामुळे मतदार नोंदणीतही त्यांच्यासाठी ‘इतर’ असा स्वतंत्र पर्याय ठेवला. तरीही कागदपत्रांच्या अभावामुळे अनेकांची नोंदणी झालेली नाही. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुरुष आणि स्त्री मतदार अशा दोनच रांगा होत्या. परंतु, यंदा ज्येष्ठ, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश दिलेले आहेत.

तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रावर प्रवेश देण्याबरोबरच त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तशाप्रकारचे निर्देश सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत. तृतीयपंथीयांना मतदान करण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता निवडणूक विभाग घेत आहे. -समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024