काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटींची मालमत्ता, पाच वर्षात झाली 'इतकी' वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:25 PM2024-10-25T12:25:25+5:302024-10-25T12:26:47+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटी ४८ लाख ७८ हजार रुपयांची स्थावर व ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 48 crore property of Rituraj Patil, candidate of Kolhapur South of Congress | काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटींची मालमत्ता, पाच वर्षात झाली 'इतकी' वाढ

काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटींची मालमत्ता, पाच वर्षात झाली 'इतकी' वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटी ४८ लाख ७८ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनीच विवरणपत्रात ही माहिती दिली. पाच वर्षात त्यांची मालमत्ता १४ कोटी रुपयांनी वाढली आहे.

आमदार पाटील यांची २५ कोटी १८ लाख ५३ हजार ८ रुपये इतकी जंगम मालमत्ता असून २३ कोटी ३० लाख २५ हजार २४२ रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे २६ कोटी ९८ लाख १४ हजार ६८६ रुपयांचे कर्ज आहे. आमदार पाटील यांची ४ कोटी ४२ लाख १० हजार ५२५ रुपये इतकी वारसाप्राप्त मालमत्ता आहे.

अशी आहे, मालमत्ता

ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा यांच्या नावावर ६७ लाख ६२ हजार ७०६ रुपये इतकी जंगम तर २ कोटी २४ लाख ६७ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा अर्जुन याच्या नावावर १ कोटी ५१ लाख ९७ हजार ५८२ रुपयांची जंगम तर २ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दुसरा मुलगा आर्यमनच्या नावावर १ कोटी ३२ लाख ६५ हजार ६२४ रुपयांची जंगम तर ९२ लाख ६८ हजार ८०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

भारती विद्यापीठातून बीबीए

आमदार पाटील यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून २०२० मध्ये बीबीए पूर्ण केले असून डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासह संलग्नित संस्थावर ते सल्लागार आहेत. त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांची फोर्ड एंडेवर हे चारचाकी वाहन आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 48 crore property of Rituraj Patil, candidate of Kolhapur South of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.