कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटी ४८ लाख ७८ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनीच विवरणपत्रात ही माहिती दिली. पाच वर्षात त्यांची मालमत्ता १४ कोटी रुपयांनी वाढली आहे.आमदार पाटील यांची २५ कोटी १८ लाख ५३ हजार ८ रुपये इतकी जंगम मालमत्ता असून २३ कोटी ३० लाख २५ हजार २४२ रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे २६ कोटी ९८ लाख १४ हजार ६८६ रुपयांचे कर्ज आहे. आमदार पाटील यांची ४ कोटी ४२ लाख १० हजार ५२५ रुपये इतकी वारसाप्राप्त मालमत्ता आहे.अशी आहे, मालमत्ताऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा यांच्या नावावर ६७ लाख ६२ हजार ७०६ रुपये इतकी जंगम तर २ कोटी २४ लाख ६७ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा अर्जुन याच्या नावावर १ कोटी ५१ लाख ९७ हजार ५८२ रुपयांची जंगम तर २ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दुसरा मुलगा आर्यमनच्या नावावर १ कोटी ३२ लाख ६५ हजार ६२४ रुपयांची जंगम तर ९२ लाख ६८ हजार ८०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
भारती विद्यापीठातून बीबीएआमदार पाटील यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून २०२० मध्ये बीबीए पूर्ण केले असून डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासह संलग्नित संस्थावर ते सल्लागार आहेत. त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांची फोर्ड एंडेवर हे चारचाकी वाहन आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.