शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Vidhan Sabha Election 2024: आता तरी ‘देवा (भाऊ)’ मला पावशील का?, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत

By समीर देशपांडे | Published: November 26, 2024 4:26 PM

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा २०१९ ते २०२२ च्या जूनपर्यंतचा कालावधी रस्त्यावर आंदोलने करण्यातच गेला. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा २०१९ ते २०२२ च्या जूनपर्यंतचा कालावधी रस्त्यावर आंदोलने करण्यातच गेला. त्यानंतर लोकसभा झाली. जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नसताना शिंदेसेनेसाठी गल्लीबोळ पालथे घालावे लागले. ज्या जिल्ह्यात ‘कमळ ब्रॅन्ड’चा एकही आमदार नव्हता, त्याठिकाणी आता अपक्षासह भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे राबलेले कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांच्या ओठी आता केवळ ‘आता तरी देवा (भाऊ) मला पावशील का’ हे एकमेव गीत आहे.२०१४ मध्ये चंद्रकांत पाटील मंत्री झाले. इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विधानसभेला निवडून आले. शौमिका महाडिक यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदा भाजपला मिळाले. परंतु, महापालिकेतील सत्तेने हुलकावणी दिली. देवस्थान समिती, ‘गोकुळ’मध्ये संधी मिळाली. परंतु, तरीही हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या एकसंघ आघाडीपुढे भाजपला मर्यादा येत होत्या. अशातच २०१९ ला विधानसभेला हाळवणकर आणि महाडिक पराभूत झाले आणि भाजप पुन्हा शून्यावर आला.त्यानंतर सत्ता मिळाली नाही आणि केवळ आंदोलने करण्याचे हाती उरले. अडीच वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता आली. परंतु, वाटेकरी वाढले. याच वाटेकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा आत्ताही सत्ता आली आहे. भाजपने दिमाखदार विजय मिळवला आणि आता कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

औटघटकेची पदे नकोत२०१९ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी भाजपने अनेकांना पदे दिली. परंतु, त्यावर वेळेत राज्यपालांच्या सह्या झाल्या नाहीत आणि अधिकृतपणे या सर्वांना या पदांचा कार्यभारही घ्यायला मिळाला नाही. आत्ताही विधानसभा जाहीर होण्याआधीच पंधरा, वीस दिवस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. परंतु, त्या अशा काळात झाल्या की त्या जाहीर करतानाही अडचण वाटल्याने व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्या. ज्या पदांचा लाभच घेता येणार नाही, अशी औटघटकेची पदे देऊन पक्षाने कार्यकर्त्यांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा आहे.

उमेदवार - मते

  • अमल महाडिक  - १,४७,९९३
  • राहुल आवाडे  -  १,३१,९१९
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणichalkaranji-acइचलकरंजीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024