दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, सतेज पाटील संतापले; काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची ऐनवेळी माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:34 PM2024-11-04T16:34:30+5:302024-11-04T16:39:07+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress leader Satej Patil was furious after Congress candidate Madhurimaraj withdrew from the election | दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, सतेज पाटील संतापले; काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची ऐनवेळी माघार

दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, सतेज पाटील संतापले; काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची ऐनवेळी माघार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यासर्व घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील छत्रपती घराण्यावर चांगलेच संतापले.

माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे. मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण नव्हती हे चुकीचे आहे महाराज, हे बरोबर नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती असे म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जेवढ्यांनी ही आग लागली तेवढ्या सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा. दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद असा संताप व्यक्त करत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.

राजेश लाटकर निवडणूक रिंगणात

राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष अर्ज भरला होता. लाटकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनाच अर्ज मागे घेतला. याघडामोडीमुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मविआला याठिकाणी अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे.

लाटकर यांची मनधरणी अयशस्वी

काँग्रेस नेते सतेज पाटील हे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले होते मात्र त्यांची भेट झाली नाही. ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यामुळे जनता उत्तरच उत्तर काय देणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

षड्यंत्र रचून उमेदवारी रद्द केली 

छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी याठिकाणी त्यांची घरी भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता. 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress leader Satej Patil was furious after Congress candidate Madhurimaraj withdrew from the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.