शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, सतेज पाटील संतापले; काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची ऐनवेळी माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 4:34 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यासर्व घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील छत्रपती घराण्यावर चांगलेच संतापले.माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे. मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण नव्हती हे चुकीचे आहे महाराज, हे बरोबर नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती असे म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जेवढ्यांनी ही आग लागली तेवढ्या सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा. दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद असा संताप व्यक्त करत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.राजेश लाटकर निवडणूक रिंगणातराजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष अर्ज भरला होता. लाटकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनाच अर्ज मागे घेतला. याघडामोडीमुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मविआला याठिकाणी अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे.लाटकर यांची मनधरणी अयशस्वीकाँग्रेस नेते सतेज पाटील हे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले होते मात्र त्यांची भेट झाली नाही. ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यामुळे जनता उत्तरच उत्तर काय देणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.षड्यंत्र रचून उमेदवारी रद्द केली छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी याठिकाणी त्यांची घरी भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024