शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल, चर्चेला उधाण; अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 1:27 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस असतानाच बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील हे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले असता ते सकाळपासूनच संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजले. यानंतर त्यांची शोधा शोध सुरू झाली आहे. काल रात्री लाटकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने आज ते आपला निर्णय जाहीर करणार होते. मात्र, सकाळपासूनच ते गायब झाल्याने चर्चेंना उधाण आले आहे. लाटकर निवडणूक लढवणार? लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला. यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर लाटकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. नेते मंडळींनी लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच ते नॉट रिचेबल असल्याने माघार घेणार की निवडणूक रिंगणात उतरणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.षड्यंत्र रचून उमेदवारी रद्द केली काल, रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता. जनतेचा रेट्यामुळे मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात  मधुरिमाराजेंच्या उमेदवारीबाबत बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झाले, त्या दृष्टीने आमची हालचाल, वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेट्यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांना निवडणुकीत उतरावे लागले असल्याचे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024