शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात काँग्रेसची मुसंडी, पण चर्चा शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीची 

By राजाराम लोंढे | Published: October 28, 2024 1:23 PM

महायुतीत शिंदेसेनाच भारी पण मित्रांना समान वाटणी

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभेसाठी महाविकास आघाडी व महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील जागा वाटपाचे घोडे अखेर पंचगंगेत बुडाले. आघाडीमध्ये दहापैकी पाच जागा घेत काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली असली तरी बिनीचे शिलेदार साेडून गेले तरी ज्येेष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर तब्बल तीन जागा पदरात पाडून घेतल्या. महायुतीमध्ये शिंदेसेना भारी ठरली असली तरी तीन मित्रांना समान वाटणी दिली.जागा वाटपावरून आघाडी व महायुती घमासान सुरू होते. ‘कोल्हापूर उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘राधानगरी’, ’चंदगड’, ‘शिरोळ’ येथील उमेदवारीवरून आघाडी व महायुतीमध्ये शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहिला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी ‘कोल्हापूर उत्तर’ मध्ये उमेदवारीचा घोळ सुरू होता. आघाडीमध्ये ‘राधानगरी’, ‘चंदगड’ व ‘काेल्हापूर उत्तर’ वरून ताणाताणी सुरू होती. जागा वाटपात दहापैकी पाच जागा घेत आमदार सतेज पाटील यांनी मुसंडी मारली असली तरी अखंड पक्ष फुटून गेल्यानंतरही तीन जागा पदरात पाडून घेऊन राजकीय मुत्सद्दीगिरी दाखवली आहे. उध्दवसेनेला दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.महायुतीमध्ये ‘कोल्हापूर उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’मध्ये जागा वाटपावरून शिंदेसेना व भाजपमध्ये संघर्ष पहावयास मिळाला. मात्र, दहापैकी तीन जागा घेत शिंदेसेना भारी ठरली. जनसुराज्य, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा तर शिरोळमध्ये राजर्षी शाहू आघाडीला एक जागा देऊन मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न केला.उध्दवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्षजागा वाटपात राज्यातही काँग्रेसच भारी ठरत असून उध्दवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यातही कोल्हापुरात २०१४ ला पक्षाचे सहा आमदार होते, २०१९ ला एक आमदार निवडून आला असला तरी बार्गिंनिगमध्ये नेते कमी पडले. महापालिका कार्यक्षेत्रातील एक जागा पक्षाला घेऊन आगामी निवडणुकीत पक्षाची मुळे अधिक घट्ट करण्याची संधी उध्दव ठाकरे यांनी घालवल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.पाच ठिकाणी काटाजोड तिरंगी लढतउमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे. सध्याचे चित्र पाहिले तर ‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘हातकणंगले’, ‘शिरोळ’ मध्ये तिरंगी लढत तर उर्वरित ठिकाणी सरळ तुल्यबळ सामना होणार आहे.

जिल्ह्यात अशा होणार लढतीमतदारसंघ        - महाविकास आघाडी  -  महायुती

  • कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर (काँग्रेस) -  राजेश क्षीरसागर (शिंदेसेना)
  • कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील (काँग्रेस) -  अमल महाडिक (भाजप)
  • करवीर  - राहुल पाटील (काँग्रेस) - चंद्रदीप नरके (शिंदेसेना)
  • राधानगरी  - के. पी. पाटील (उध्दवसेना) - प्रकाश आबीटकर (शिंदेसेना)
  • शाहूवाडी  - सत्यजीत पाटील-सरुडकर (उध्दवसेना) - विनय कोरे (जनसुराज्य)
  • चंदगड - नंदिनी बाभूळकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) - राजेश पाटील (राष्ट्रवादी)
  • कागल - समरजीत घाटगे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
  • हातकणंगले - राजू आवळे (काँग्रेस) - अशोकराव माने (जनसुराज्य)
  • इचलकरंजी -  मदन कारंडे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - राहुल आवाडे (भाजप)
  • शिरोळ - गणपतराव पाटील (काँग्रेस) -  राजेंद्र पाटील-यड्रावकर (शाहू आघाडी)
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे