शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

इन्स्टावर ऋतुराज, सतेज पाटील यांची बदनामी; नऊ युजरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 6:42 PM

सायबर पोलिसांकडून तपास

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवरून व्हायरल केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी इन्स्टाच्या नऊ युजर्सवर गुन्हा दाखल केला. याबाबत काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय विष्णू पोवार (वय ५५, रा. मार्केट यार्ड रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापताच सोशल मीडियातून बदनामीचे प्रकार सुरू झाले आहेत. विविध बनावट नावांनी सुरू असलेल्या इन्स्टा अकाऊंटवरून आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रकार लक्षात येताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित इस्टा अकाऊंट युजर्सविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार ९ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRuturaj Patilऋतुराज पाटीलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024