कोल्हापूर : पंधराव्या विधानसभेसाठी जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. सकाळी ७ वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघात झाले आहे. ११ वाजेपर्यंत करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत असून सध्या महायुतीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्यांविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल, माजी आमदार अमल महाडिक, जनसुराज्यचे अशोकराव माने, माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात समरजित घाटगे, राजेश लाटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, गणपतराव पाटील, मदन कारंडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर राधानगरीतून अपक्ष ए. वाय. पाटील, शिरोळमधून स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंलेतून स्वाभिमानीकडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंदगडमधून अपक्ष शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील, जनसुराज्यचे मानसिंग खोराटे, करवीरमधून जनसुराज्यचे संताजी घोरपडे हेदेखील आपले नशीब अजमावत आहेत.सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड - ६.७८ टक्के
- राधानगरी - ६.६७ टक्के
- कागल – ८.७८ टक्के
- कोल्हापूर दक्षिण – ७.२५ टक्के
- करवीर – ७.७६ टक्के
- कोल्हापूर उत्तर – ८.२५ टक्के
- शाहूवाडी – ७.२३ टक्के
- हातकणगंले – ६.२० टक्के
- इचलकरंजी – ७.४७ टक्के
- शिरोळ – ७.५३ टक्के
सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदानसकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड – २२.०१ टक्के
- राधानगरी - २३.०० टक्के
- कागल – २३.६८ टक्के
- कोल्हापूर दक्षिण – १७.५७ टक्के
- करवीर – २६.१३ टक्के
- कोल्हापूर उत्तर – २०.७५ टक्के
- शाहूवाडी – १७.५२ टक्के
- हातकणगंले – १४.२५ टक्के
- इचलकरंजी – १९.७७ टक्के
- शिरोळ – २१.४३ टक्के
दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड – ३९.१९ टक्के
- राधानगरी – ४२.८२ टक्के
- कागल – ४१.३६ टक्के
- कोल्हापूर दक्षिण – ३५.१५ टक्के
- करवीर – ४५.२९ टक्के
- कोल्हापूर उत्तर – ३५.५३ टक्के
- शाहूवाडी – ४१.३० टक्के
- हातकणगंले – ३५.१५ टक्के
- इचलकरंजी – ३२.७९ टक्के
- शिरोळ – ३७.०३ टक्के