शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 6:25 PM

कोल्हापूर उत्तरला जरी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली असली तरीही लाटकर यांना काँग्रेसने पाठबळ दिल्यास ही लढतही चुरशीची होणार

कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या आणि फेरमांडणी करणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांतील लढती अटीतटीच्या होणार हे सोमवारी स्पष्ट झाले. चंदगड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून, राधानगरीमध्येही ए. वाय. पाटील यांना थांबवण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. एकीकडे जनसुराज्य शक्ती महायुतीमध्ये असताना दोन मतदारसंघांत जनसुराज्यने बंडखोरी केली आहे. कोल्हापूर उत्तरला जरी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली असली तरीही लाटकर यांना काँग्रेसने पाठबळ दिल्यास ही लढतही चुरशीची होणार आहे.चंदगड मतदारसंघात भाजपच्या शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उभे राहत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. ते फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. तर महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभूळकर यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी पुन्हा त्यांना आव्हान दिले आहे. त्यांना थांबवण्यात सतेज पाटील यांना अपयश आले. या ठिकाणी जुनसुराज्यच्या मानसिंग खोराटे यांनी रंगत वाढवली असून, त्याचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.राधानगरीमध्ये शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिकटर विरुद्ध उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्या संघर्षात जिल्हा बँकेचे आजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या बंडखोरीने चुरस निर्माण केली आहे. वास्तविक ते पक्षीय उमेदवारीसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या संपर्कात होते. परंतु, तिथे मेहुणे के. पी. यांनी बाजी मारली आणि ए. वाय. यांची समजूत काढणे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हाताबाहेर गेले. त्यामुळे लोकसभेला शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्य देणाऱ्या राधानगरी मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. कोल्हापूर दक्षिणमध्येही दुरंगी लढत असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांना भिडणार आहेत.करवीर मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांच्याविरोधात शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात प्रमुख लढत असून, या ठिकाणी जनसुराज्यने संताजी घोरपडे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतर कळणार आहे.कोल्हापूर उत्तरमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात राजेश लाटकर यांची लढत होईल. ते जरी अपक्ष असले तरी त्यांना काँग्रेस पाठबळ देण्याची शक्यता आहे.शाहूवाडीमध्ये पारंपरिक दुरंगी लढत असून, जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार विनय काेरे विरुद्ध उद्धवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर रिंगणात आहेत.हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे, जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने आणि माजी आमदार स्वाभिमानीचे डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात सामना रंगेल. या ठिकाणी स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंडखोरी केली आहे.इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे लढत होणार असून, अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे हेदेखील रिंगणात आहेत. परंतु, या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्यासह काही मराठा उमेदवारांनी माघार घेत कारंडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे स्वत:च्या शाहू आघाडीतून रिंगणात असून, त्यांना महायुतीचे पाठबळ मिळणार आहे, तर गणपतराव पाटील काँग्रेसकडून व माजी आमदार उल्हास पाटील स्वाभिमानीकडून रिंगणात उतरले आहेत.

चंदगड१ नंदाताई ऊर्फ नंदिनी कुपेकर-बाभुळकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), तुतारी वाजविणारा माणूस२ श्रीकांत अर्जुन कांबळे (बहुजन समाज पार्टी), हत्ती३ राजेश नरसिंगराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), घड्याळ४ अर्जुन मारोती दुडंगेकर (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलिंडर५ मानसिंग गणपती खोराटे, (जनसुराज्य शक्ती), नारळाची बाग६ परशराम पांडुरंग कुट्रे, (संभाजी ब्रिगेड पार्टी), शिवणयंत्र७ अप्पी ऊर्फ विनायक वीरगोंडा पाटील, (अपक्ष), बादली८ अशोक शंकर आर्दाळकर, (अपक्ष), ट्रम्पेट९ अक्षय एकनाथ डवरी, (अपक्ष), शिट्टी१० जावेद गुलाब अंकली, (अपक्ष), हिरा११ तुलसीदास लक्ष्मण जोशी, (अपक्ष), बासरी१२ समीर महंमदइसाक नदाफ, (अपक्ष), हिरवी मिरची१३ प्रकाश रामचंद्र रेडेकर, (अपक्ष), ऊस शेतकरी१४ मोहन प्रकाश पाटील, (अपक्ष), स्टूल१५ रमेश सटुपा कुट्रे, (अपक्ष), टेबल१६ शिवाजी सटुपा पाटील (अपक्ष), पाण्याची टाकी१७ संतोष आनंदा चौगुले, (अपक्ष), कपाट

राधानगरी१ प्रकाश आनंदराव आबिटकर (शिवसेना), धनुष्यबाण२ कृष्णराव परशराम ऊर्फ के. पी. पाटील (उद्धवसेना), मशाल३ पांडुरंग गणपती कांबळे (बहुजन समाज पार्टी), हत्ती४ युवराज रामचंद्र यडुरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन५ आनंदराव यशवंत ऊर्फ ए. वाय. पाटील (अपक्ष), ट्रम्पेट६ कुदरतुल्ला आदम लतीफ (अपक्ष), टेबल७ के. पी. पाटील (अपक्ष), चिमणी

कागल१ अशोक बापू शिवशरण (बहुजन समाज पार्टी), हत्ती२ समरजित विक्रमसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), तुतारी वाजविणारा माणूस३ हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), घड्याळ४ रोहन अनिल निर्मळ, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन५ धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलिंडर६ ॲड. कृष्णाबाई दीपक चौगुले (अपक्ष), ब्रीफकेस७ पंढरी दत्तात्रय पाटील (अपक्ष), रोड रोलर८ प्रकाश तुकाराम बेलवाडे (अपक्ष), शिट्टी९ राजू बाबू कांबळे (अपक्ष), हिरा१० विनायक अशोक चिखले (अपक्ष), ऑटोरिक्षा११ सातापराव शिवाजीराव सोनाळकर (अपक्ष), ट्रम्पेट

कोल्हापूर दक्षिण१ अमल महादेवराव महाडिक (भारतीय जनता पार्टी) कमळ२ ऋतुराज संजय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) हात३ सुरेश सायबू आठवले (बहुजन समाज पार्टी) हत्ती४ अरुण रामचंद्र सोनवणे (स्वाभिमानी पक्ष) क्रेन५ विशाल केरू सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी६ विश्वास रामचंद्र तराटे (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए)) शिवण यंत्र७ गिरीश बाळासाहेब पाटील (अपक्ष) बुद्धिबळ पट८ माधुरी भिकाजी कांबळे (अपक्ष) गॅस शेगडी९ ॲड. यश सुहास हेगडे पाटील (अपक्ष) कोट१० वसंत जिवबा पाटील (अपक्ष) नारळाची बाग११ सागर राजेंद्र कुंभार (अपक्ष) हिरा

करवीर१ विष्णू पांडुरंग गायकवाड (बहुजन समाज पाटील) हत्ती२ चंद्रदीप शशिकांत नरके (शिवसेना) धनुष्य बाण३ राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर) (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात४ हरी दत्तात्रय कांबळे (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए) शिवण यंत्र५ दयानंद मारुती कांबळे (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर६ बाबा ऊर्फ संताजी फत्तेसिंगराव घोरपडे (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग७ अरविंद भिवा माने (अपक्ष) कॅरम बोर्ड८ असीफ शबाब मुजावर (अपक्ष) अंगठी९ ॲड. कृष्णाबाई दीपक चौगले (अपक्ष) हिरा१० माधुरी राजू जाधव (अपक्ष) प्रेशर कुकर११ ॲड. माणिक शिंदे (अपक्ष) शिट्टी

कोल्हापूर उत्तर१ अभिजित दौलत राऊत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन२ राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना) धनुष्यबाण३ श्याम भीमराव पाखरे (बहुजन समाज पार्टी) हत्ती४ संजय भिकाजी मागाडे (लोकराज्य जनता पार्टी) नागरिक५ चंद्रशेखर श्रीराम मस्के (अपक्ष) ऑटोरिक्षा६ दिलीप जमाल मोहिते (अपक्ष) हिरा७ राजेश भरत लाटकर (अपक्ष) प्रेशर कुकर८ विनय विलास शेळके (अपक्ष) त्रिकोण९ शर्मिला शैलेश खरात (अपक्ष) ट्रम्पेट१० डॉ. गिरीश रामकृष्ण पुणतांबेकर (अपक्ष) गॅस सिलिंडर११ सदाशिव गोपाळ कोकितकर (अपक्ष) दूरध्वनी

शाहूवाडी१ डॉ. भारत कासम देवळेकर सरकार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन२ शामला उत्तमकुमार सरदेसाई (बहुजन समाज पार्टी) हत्ती३ सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल४ अभिषेक सुरेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी५ आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू) (संभाजी ब्रिगेड पार्टी) शिवणयंत्र६ संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी) अंगठी७ डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग८ ॲड. दिनकर गणपती घोडे (अपक्ष) नागरिक९ धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (अपक्ष) ऑटोरिक्षा१० विनय वि. कोरगावकर (सावकर) (अपक्ष) भेंडी११ विनय वि. चव्हाण (सावकर) (अपक्ष) झोपाळा१२ सत्यजित बाळासाहेब पाटील (आबा) (अपक्ष) चिमणी१३ सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष) गळ्याची टाय१४ संभाजी सीताराम कांबळे (अपक्ष) बॅट

हातकणंगले१ अमर राजाराम शिंदे (बहुजन समाज पार्टी) हत्ती२ राजू (बाबा) जयवंतराव आवळे (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात३ दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग४ डॉ. क्रांती दिलीप सावंत (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर५ डॉ. गणेश विलासराव वाईकर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) ट्रम्पेट६ डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (स्वाभिमानी पक्ष) शिट्टी७ अजित कुमार देवमोरे (अपक्ष) ऑटोरिक्षा८ अशोक तुकाराम माने (अपक्ष) झोपाळा९ शिवाजी महादेव आवळे (अपक्ष) बॅट१० कराडे धनाजी लहू (अपक्ष) कपाट११ वैभव शंकर कांबळे (अपक्ष) प्रेशर कुकर१२ तुकाराम सबाजी कांबळे (अपक्ष) जातं१३ देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष) ट्रक१४ प्रगती रवींद्र चव्हाण (अपक्ष) ऊस शेतकरी१५ प्रदीप भीमसेन कांबळे (अपक्ष) फलंदाज१६ सतीश संभाजी कुरणे (अपक्ष) लिफाफा

इचलकरंजी१ अमर राजाराम शिंदे, (बहुजन समाज पाटी) हत्ती२ मदन सीताराम कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तुतारी वाजवणारा माणूस३ रवी गजानन गोंदकर, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन४ राहुल प्रकाश आवाडे (भारतीय जनता पार्टी) कमळ५ डॉ. प्रशांत गंगावणे सर, (देश जनहित पार्टी) शाळेचे दप्तर६ सचिन किरण बेलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष) हिरा७ शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन, (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर८ अभिषेक आदगोंडा पाटील (अपक्ष) बॅट९ मदन येताळा कारंडे (अपक्ष) अंगठी१० विठ्ठल पुंडलीक चोपडे (अपक्ष) शिट्टी११ रावसो गणपती निर्मळे (अपक्ष) लिफाफा१२ शाहुगोंड सातगोंड पाटील (अपक्ष) प्रेशर कुकर१३ सॅम ऊर्फ सचिन शिवाजी आठवले (अपक्ष) ट्रम्पेट

शिरोळ१ गणपतराव आप्पासाहेब पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात२ दादासो तुकाराम मोहिते (बहुजन समाज पार्टी) हत्ती३ उल्हास संभाजी पाटील (स्वाभिमानी पक्ष) स्नॅपर४ विश्वजित पांडुरंग कांबळे (रिपब्लिकन सेना) लिफाफा५ राजेंद्र श्यामगोंडा पाटील (यड्रावकर) (राजर्षी शाहू विकास आघाडी) शिट्टी६ गजाला मुबीन मुल्ला (आष्टेकर) (अपक्ष) शिवणयंत्र७ जितेंद्र रामचंद्र ठोंबरे (अपक्ष) प्रेशर कुकर८ राहुल रामकृष्ण कांबळे (अपक्ष) पेट्रोलपंप९ शीला श्रीकांत हेगडे (अपक्ष) गॅस सिलिंडर१० शंकर रामगोंडा बिराजदार (अपक्ष) बॅट

सर्वाधिक उमेदवार चंदगडमध्येमहाविकास आणि महायुती अशा दोन्हीकडेही बंडखोरी केवळ चंदगड तालुक्यातच झाली आहे. दहापैकी सर्वाधिक उमेदवार हे चंदगड मतदारसंघात १७ असून, सर्वात कमी उमेदवार राधानगरी मतदारसंघात ७ आहेत.

चार मतदारसंघांत ११ उमेदवारमाघारीनंतर चार मतदारसंघांत प्रत्येकी ११ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkagal-acकागलradhanagari-acराधानगरीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती