कोल्हापूर : लोकसभेवेळी गादीचा मान, मान म्हणणाऱ्या सतेज पाटील यांनी केवळ सत्तेसाठी शाहू छत्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत दम दिला. हे कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. ते स्वत:ला राजघराण्यापेक्षा मोठे समजतात का, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. ते पत्रकारांशी बोलत होते.महाडिक म्हणाले, महायुतीच्या सभेआधीच ‘सरप्राईज गिफ्ट’ आज मिळाले. कोल्हापूर उत्तरमधून हात चिन्हच गायब झाले. दिल्लीहून दिलेली उमेदवारी रद्द झाली आणि अपमान झाला. सतेज पाटील यांच्या कामाची पध्दत घमेंडीची आहे. पहिल्यांदा कार्यकर्ता पॅटर्न म्हणत राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. मग ती बदलली. राहुल गांधी यांनी दिलेल्या उमेदवारीचा अवमान केला. लाटकर यांची समजूत काढण्याची नामुष्की आली आणि मग अर्ज मागे घेतल्यानंतर ज्या भाषेत त्यांनी दम दिला. ते योग्य नाही. केवळ आपले राजकारण यशस्वी करण्यासाठी राजघराण्याचा वापर त्यांनी केला. याआधीही त्यांनी हसन मुश्रीफ, विनय कोरे. पी. एन. पाटील यांचा वापर करून सत्ता ताब्यात घेतल्या.
सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का, धनंजय महाडिक यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 1:47 PM