शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

निवडणुकीसाठी आश्वासनांचा महापूर, किती वर्षे नुसतीच चर्चा अन् कोल्हापूरकरांची बोळवण करणार?

By भारत चव्हाण | Published: November 07, 2024 3:27 PM

एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही

भारत चव्हाणकोल्हापूर : अनेक वर्षे सत्तेत राहिलेले तसेच सत्तेबाहेर राहिलेले सर्वपक्षीय नेते प्रत्येक निवडणुकीत पंचगंगा प्रदूषण, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, शाहू मिलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक, कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु यातील एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही. तरीही यंदाच्या निवडणुकीत नेतेमंडळी या प्रश्नावर चर्चा करताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे नुसती वाफाळ चर्चा आणि बोळवण करण्याचे काम सुरू आहे.महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कोल्हापुरात झाला. तेंव्हा निवडणुकीच्या व्यासपीठावर नेते मंडळींनी कोल्हापूरच्या प्रश्नांना हात घातला. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत जो अनुभव येतो तोच अनुभव याही वेळेला येऊ लागला आहे. अगदी परवाच्या लोकसभेला निवडणुकीत जी आश्वासने दिली होती तीच पुन्हा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या आवाजात दिली आणि आपणच कसे कोल्हापूरचे हितकर्ते आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

पंचगंगा प्रदूषण तसेच महापुराचे पाणी वळवण्यासाठीच्या ३२०० कोटींच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी कोल्हापूरच्या महापुरावर उपाययोजना म्हणूनच नाही तर दुष्काळी भागाला पाणी नेण्याचा हा महत्वाकांक्षी प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जातून हा प्रयोग होत आहे. याची गेल्या दहा वर्षापासून नुसती चर्चाच सुरू आहे. ३२०० कोटींचा निधी प्रत्यक्षात येणार कधी..? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या बाबतीत तर अनेक सरकारनी अनेक वेळा आश्वासने दिली, परंतु या आराखड्यातील मंजूर निधीतील नऊ कोटी रुपये मिळाले आहेत, बाकीचा निधी अद्यापही कागदावरच आहे. पहिल्या टप्प्यातील कामापैकी केवळ बहुमजली वाहनतळाचे काम रडतखडत पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दर्शनरांग, भक्तनिवास याची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना आजही उन्हात उभे राहून दर्शन घ्यावे लागते. स्वच्छ मुतारीची शोधाशोध करावी लागते. काही काही वेळेला राहण्यासाठी जागा न मिळाल्याने भाविक, पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

शाहूमिल स्मारकाबद्दल उदासीनताशाहूमिलच्या जागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकावर देखील वारंवार चर्चा होत असते. परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नाही. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही जागा राज्य सरकारकडे वर्ग करून घ्यायलाही राज्यकर्त्यांना जमलेले नाही. इतकी उदासीनता या स्मारकाच्या बाबतीत आहे.

हद्दवाढीची बोळवणकोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा कोल्हापूरकरांना आश्वासित केले. मोठ्या जोषपूर्ण भाषणात नेते मंडळीनी आश्वासने दिली, पण केले काहीच नाही, उलट कोल्हापूरकरांनीच एकमत करावे, अशी सूचना करून या प्रश्नावर अक्षरश: बोळवण करण्यात आली.

रस्त्यांची स्थिती दयनीय..कोल्हापूरातील अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. याच शासनाने त्यासाठी १०० कोटींची निधी दिला. परंतु त्यातील रस्ते अजून झालेले नाहीत. आजपर्यंत निधी नाही म्हणून रस्ते होत नाहीत असे सांगितले जाई आता निधी असूनही लोकांची खड्ड्यांनी कंबर मोडत आहे परंतु त्याचे उत्तर कोणत्याच नेत्याने दिले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरpollutionप्रदूषणPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024