शहरं
Join us  
Trending Stories
1
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
2
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
3
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
4
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
5
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
6
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
7
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
8
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
9
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
10
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
11
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
12
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
13
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
14
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
15
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा
16
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
17
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
18
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
19
रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
20
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान

आचारसंहिता भंगाच्या कोल्हापूर ‘दक्षिण’मध्ये सर्वाधिक तक्रारी, 'या' मतदारसंघांतून एकही तक्रार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:49 AM

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यान्वित केलेल्या सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत २८ तक्रारी आल्या ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यान्वित केलेल्या सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत २८ तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक १२ तक्रारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून या ॲपवर एकही तक्रार दाखल झालेली नाही. ॲपवर आलेल्या प्रत्येक तक्रारीचे शंभर मिनिटांत निरसन करण्यासाठी जिल्ह्यात ९२ पथके कार्यरत आहेत. तरीही तक्रारीचा ओघ कमीच असल्याने निवडणूक यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे.विधानसभेसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. या कालावधीत विनापरवाना प्रचार फलक लावले, उमेदवार, समर्थकांनी पैसे वाटप करणे, प्रचाराच्या लाऊड स्पीकरचा आवाज मर्यादेचे उल्लंघन करणे, जातीय द्वेषयुक्त भाषण करणे, अवैध मद्य वाटप किंवा वाहतूक करणे, बंदूक दाखवणे किंवा धमकावणे, प्रलोभन दाखवणे अशा घटनांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आयोगाने सी-व्हिजील ॲप सुरू केले आहे. याचा प्रभावी वापर होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने जागृतीही केली आहे. पण या निवडणुकीत ॲपवर तक्रारी येण्याचे प्रमाण कमी आहे.सी-व्हिजील ॲप डाऊनलोड करणे, वापरणे सोपे आहे. निवडणुकीसंबंधीच्या गैरप्रकारांबाबत फोटो, व्हिडीओ काढून ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन १०० मिनिटांत निवडणूक यंत्रणेची फिरती भरारी पथक घटनास्थळी पोहोचून तक्रारींचे निवारण करीत आहेत. यासाठी ९२ पथके कार्यरत आहेत. एका पथकात तीन कर्मचारी आहेत. ही पथके फिरती आहेत. यामुळे तक्रारी आली की ती सक्रिय होऊन तातडीने कार्यवाही करतात. या ॲपवरून दिलेली माहिती आणि तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जात आहे. तरीही ॲपवरून अजून पाच विधानसभा मतदारसंघांतून एकही तक्रार आलेली नाही. तक्रार करण्याकडे सुज्ञ मतदारांनी का पाठ फिरवली आहे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या मतदारसंघातून एकही तक्रार नाही..इचलकरंजी, चंदगड, शिरोळ, करवीर, राधानगरी विधानसभा मतदारसंघांतून ॲपवर एकही तक्रार आलेली नाही. या सर्व मतदारसंघांत चुरशीने लढत होत आहे. जेवणावळी, आमिषे, शपथा सुरू असल्याची उघड चर्चा सुरू आहे. तरीही तक्रारी दाखल झालेली नाही. यामुळे कशाला तक्रार करायची, मिळतंय तर घ्या की? अशी मानसिकता मतदारामध्ये बळावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दाखल तक्रारींची संख्यामतदारसंघनिहाय अशीदक्षिण : १२, उत्तर : ९, कागल : ३, हातकणंगले : २, शाहूवाडी : १

बॅनर, पोस्टर लावल्याच्या अधिकआतापर्यंत आलेल्या २८ तक्रारींत सर्वाधिक तक्रारी या विनापरवाना प्रचार बॅनर, पोस्टर, फलक लावण्याच्या तक्रारी आहेत. जाहीर भाषणातून आमिषे, धमकीची भाषा काही ठिकाणी वापरली जात आहेत. पण याची तक्रार ॲपवरून झालेली नाही, हे विशेष आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणCode of conductआचारसंहिताwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024