शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफांच्या डबल हॅट्ट्रिकला समरजित यांचे आव्हान, कागलमध्ये दुरंगीमुळे काटाजोड लढत

By विश्वास पाटील | Published: November 11, 2024 6:06 PM

जनता कुणाच्या पाठीशी यावरच निकाल

विश्वास पाटीलकोल्हापूर : गेली तीस वर्षे कागलच्या राजकारणावर मांड ठेवून असलेले मातब्बर नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे नेते समरजित घाटगे यांच्यात कागल विधानसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत होत आहे. मुश्रीफ राष्ट्रवादीकडून, तर घाटगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. कागलमधील तीन प्रबळ गट व बहुतांशी नेते मुश्रीफ यांच्या पाठीशी आहेत. आता जनता कुणाच्या पाठीशी राहते यावरच मुश्रीफ यांच्या डबल हॅट्ट्रिकचा निर्णय लागेल.मुश्रीफ सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. या मतदारसंघात जेव्हा एकास एक लढत होते तेव्हा ती अधिक चुरशीची होते. गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांना संजय घाटगे यांच्या उमेदवारीचा फायदा झाला. तिरंगी लढतीत ते सहज निवडून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवारच मिळू नये यासाठी संजय घाटगे यांना त्यांनी अगोदरच सोबत घेतले.समरजित घाटगे हे भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडणार नाहीत, असा त्यांचा अंदाज होता; परंतु त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उमेदवारी घेतली. स्वत: पवार यांनीच आता मुश्रीफ यांना आव्हान दिल्याने राज्याचे लक्ष या लढतीकडे आहे. मुश्रीफ हा कसलेला पैलवान आहे तो हे आव्हान कसे पेलतो यावरच निकाल अवलंबून असेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे..

  • विकासकामे झाली तरी त्यातून मतदारसंघाचा नव्हे तर ठरावीक ठेकेदारांंचेच भले झाल्याचा आरोप
  • शाश्वत विकास, बेरोजगारीचा प्रश्न, गडहिंग्लज एमआयडीसीत नव्या उद्योगांची वानवा.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय झाले हाच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील कळीचा मुद्दा ठरला आहे. लोकसभेला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी पालकमंत्री मुश्रीफ. आताचे विरोधी उमेदवार व तत्कालीन भाजप नेते समरजित घाटगे हे होते. म्हणजे तालुक्यातील तीन प्रबळ गट मंडलिक यांच्या पाठीशी होते. मुश्रीफ यांनी या निवडणुकीत त्यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याची घोषणा केली होती; परंतु प्रत्यक्षात मंडलिक यांना १४ हजार ४२६ मताधिक्य मिळाले. त्यास कोण कोण कारणीभूत होते याचा हिशोब आता मंडलिक गट मागू लागला आहे.

  • एकूण मतदार : ३,३९,८४४
  • पुरुष : १,६९,८१८
  • महिला : १,७०,०२१
  • एकूण केंद्रे : ३५८ 

२०१९ मध्ये काय घडले?

  • हसन मुश्रीफ राष्ट्रवादी (विजयी) : १,१६,४३६
  • समरजित घाटगे अपक्ष ८८,३०३.
  • संजय घाटगे शिवसेना : ५५,६५७
  • नोटा : ११६३.

२०१९च्या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी..?वर्ष - विजयी उमेदवार - पक्ष - मते - टक्के२०१४ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी -१,२३,६२६ - ९.१६)२००९ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - १,०४,२४१ - (४६.३३)२००४ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - ७९,५३३ - (४९.०४)१९९९ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - ६७,६१० - (५०.०९)१९९८ - पोटनिवडणूक - संजय घाटगे - शिवसेना - ६७,४७२ - (५२.४३)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024