शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सतेज पाटील मित्र म्हणून येतात, स्वार्थ साधल्यावर शत्रू होतात; चंद्रदीप नरकेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 1:11 PM

कोपार्डे : दोस्तीच्या आडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या सतेज पाटील यांना मदत केलेल्या नेत्यांची ॲलर्जी होते. आपलं काम झाले की ...

कोपार्डे : दोस्तीच्या आडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या सतेज पाटील यांना मदत केलेल्या नेत्यांची ॲलर्जी होते. आपलं काम झाले की त्याचा नेमका गेम करायची त्यांची पध्दत उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण हा गेम करवीर विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्यावर उलटवून सत्तेची हाव घालवतील व माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसात वावरणाऱ्या कार्यकर्त्याला बहुमताने निवडून देतील, असा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. खुपीरे (ता. करवीर) येथील सभेत ते बोलत होते. आनंदा जगदाळे अध्यक्षस्थानी होते. सभेला मोठी गर्दी उसळली होती.नरके म्हणाले, शिवाजी विद्यापीठ स्टुंडट कौन्सिलच्या निवडणुकीत मदतीसाठी माझ्याकडे आले आणि अध्यक्ष झाले. जिल्हा बँकेच्या १९९९ च्या निवडणुकीत गगनबावड्यातून दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील यांची मदत पाहिजे, म्हणून माझ्याकडे आले. पण, पुढे पाटील यांचा गटच हायजॅक केला. ‘गोकुळ’च्या सभेत जाण्याचे तुमचे धाडस नव्हते, आम्ही सोबत आलो नसतो तर तुमची सत्ता आली असती काय..? तुम्ही दक्षिणची काळजी करा.. ?महादेवराव महाडिक यांची मदत घेऊन २००४ ला आमदार झाला, संजय मंडलिक यांचा वापर करून महाडिक यांचा काटा काढला. आता शाहू छत्रपतींना पुढे करून मंडलिक यांचा काटा काढलात. ‘उत्तर’च्या उमेदवारीवरून राजघराण्याचा अपमान केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सात जिल्हा परिषद सदस्य दिले. त्यावेळी पक्षश्रेष्ठींना तुम्ही दिलेला शब्द आणि शपथा आठवतात का? जे जे मदत करतात त्यांना संपविण्याचे काम सतेज पाटील करतात. पण जनता या निवडणुकीत माझ्या पाठीशी आहे. जनताच त्यांची सत्तेची हाव उतरवील, असे नरके यांनी सांगितले.शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले. राजवीर नरके, कुंभी संचालक संजय पाटील, तानाजी पाटील, के. डी. पाटील, आकाराम पाटील, सखाराम पाटील, संदीप पाटील, राऊ माळावले, दिनकर जांभळे, मुकुंद पाटील, एस. के. पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप शिंदे, यशोदा पाटील, निरीक्षक शारदा जाधव, शुभांगी पोवार, माधुरी पाटील, संजय सखाराम पाटील उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karvir-acकरवीरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024