Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 07:41 PM2024-10-23T19:41:09+5:302024-10-23T19:41:36+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. आज सकाळीच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनाही आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून सत्यजीत आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याविरोधात सत्यजीत पाटील अशी लढत होणार आहे. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून के.पी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात के.पी. पाटील यांच्यात लढत होणार आहे.
के.पी. पाटील यांनी आज सकाळीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याआधी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होते. महाविकास आघाडीमध्ये राधानगरीची जागा ठाकरे गटाला गेली आहे.
ठाकरे गटाने आज उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागावाटप अजूनही सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी दिली महाविकास आघाडीमध्ये तिनही पक्ष ८५ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. ८५ चा फॉर्म्युला ठरला आहे. अन्य १८ जागा या घटक पक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांच्यासह इतर पक्षातून प्रवेश घेतलेल्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याचं चित्र आहे. त्यात पहिल्या यादीत १३ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds