शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा माज जनता उतरविणार - डॉ. प्रकाश शहापूरकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:25 IST

समरजीत घाटगे यांना शहापूरकर गटाचा पाठिंबा

गडहिंग्लज : निवडणुका आल्या की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माणसे विकत घ्यायची सवय झालेली आहे. त्यांच्या पैशांना माझ्यासह एकही माझा कार्यकर्ता कधीही बळी पडलेला नाही, मिंधा नाही. जिल्ह्यातील प्रत्येक कामात ते स्वतःच्या सोयीने काम करत आहेत. त्यांची बेताल वक्तव्ये अशोभनीय असून, त्यांना पराकोटीचा सत्तेचा माज आलेला आहे. हा माज विधानसभेच्या निवडणुकीत जनता नक्की उतरविणार, असा विश्वास गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी व्यक्त केला.कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील भावेश्वरी संकुलमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजीत घाटगे यांना डॉ. शहापूरकर गटाने पाठिंबा दिला. शहापूरकर म्हणाले पालकमंत्र्यांचे सात हजार कोटींच्या विकासकामांचे ढोल म्हणजे जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळफेक आहे. गोड साखर कारखान्यातील हस्तक्षेपाबद्दल त्यांना पळता भुई देखील थोडी होईल इतके पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.घाटगे म्हणाले, जनतेने ज्यांना पंधरा वर्षे सत्ता दिली, त्यांनी येथील घराघरांमध्ये केवळ भांडणे लावूनच सत्ता भोगली. आम्ही मंजूर करून आणलेले कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करण्याचे पाप पालकमंत्र्यांनी केले. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.शिवाजी खोत यांनी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेच्या घरादारावर नांगर फिरवल्याचा आरोप केला. यावेळी शिवानंद माळी, ॲड. दिग्विजय कुराडे, सुरेश कुराडे, पवन इंचनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोड साखरच्या संचालिका कविता पाटील, प्रकाश पाटील,आनंद कुलकर्णी, बचाराम मोहिते, डॉ.अनिल कुराडे यांच्यासह कौलगे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी,महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोंडिबा पवार यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव डोंगरे यांनी आभार मानले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024