शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Vidhan Sabha Election 2024: सभा विशाल; तरी पेटली नाही मशाल!, उद्धवसेनेवर आत्मचिंतनाची वेळ

By पोपट केशव पवार | Published: November 26, 2024 4:42 PM

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही

पोपट पवारकोल्हापूर : मराठी अस्मितेचे वारे फुलवत १९९० पासून कोल्हापूर जिल्ह्यात बाळसे धरलेल्या शिवसेनेने दहा वर्षांपूर्वी तब्बल सहा आमदार निवडून दिले. मात्र, पक्षफुटीनंतर उडालेली शकले, मूळच्या शिवसैनिकांचा कमी झालेला आत्मविश्वास अन् नेतृत्वाने घेतलेली कचखाऊ भूमिका यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. सभांची विशाल गर्दी होऊनही मशाल का पेटली नाही याचे आत्मचिंतन करण्याची वेळ उबाठा गटावर आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात उबाठा पक्ष राधानगरी व शाहूवाडी मतदारसंघात मैदानात उतरला होता. राधानगरीत के.पी. पाटील तर शाहूवाडीत सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या राज्यस्तरीय प्रचाराचा नारळच के.पी. यांच्या मतदारसंघातून आदमापूर येथे फोडला होता. या सभेतील उत्साह अन् गर्दीने उबाठा गटाचा आत्मविश्वास दुणावला; मात्र, या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. शाहूवाडीतही सत्यजित पाटील-सरुडकर यांना लोकसभेनंतर सलग दुसऱ्यांदा विधानसभेला पराभव पत्करावा लागला.

कोल्हापूर जिल्ह्यात १९९० मध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिल्हाभर पाय पसरले. २००९ च्या निवडणुकीत सेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. पुढे २०१४ च्या निवडणुकीत तब्बल सहा आमदारांनी भगवा फडकावत जिल्हा शिवसेनामय करून टाकला. मात्र, सर्वाधिक जागा मिळूनही मंत्रिपद न दिल्याने पक्ष विस्ताराला मर्यादा आल्या. सत्ता असूनही सत्तेची सावली न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ आली.परिणामी, २०१९ च्या निवडणुकीत राधानगरीत प्रकाश आबिटकर यांच्या रूपात एकमेव शिवसैनिकाला विधानसभेत जाता आले. पक्षाची ही वाताहत थांबता थांबत नसताना पक्षफुटीनंतर आबिटकर यांनीही शिंदेसेनेची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे जिल्ह्यात नव्याने पक्षबांधणीचे आव्हान उभे राहिले. मात्र, नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. जे राहिले ते निष्ठावंत म्हणत त्यांनी प्रचारातही ‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ असा मुद्दा रेटला. मात्र, तो तितकासा जनतेला भावला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.जागावाटपातही माघार२०१९ च्या निवडणुकीत ज्या जागा ज्या पक्षाने लढवल्या व जेथे कोणाचा विद्यमान आमदार असेल त्यांना त्या जागा देण्याचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला होता. उद्ववसेनेने राधानगरी, शाहूवाडी या पूर्वीच्या जागा घेतल्या. मात्र, शिरोळची जागा त्यांना काँग्रेससाठी सोडावी लागली. शिवाय, हातकणंगले, कोल्हापूर उत्तर व चंदगडमध्येही त्यांना या फॉर्म्युलाचा तोटा सहन करावा लागला. लोकसभेलाही त्यांनी हक्काची जागा काँग्रेससाठी साेडली होती.

उमेदवारांना मिळालेली मते

  • के.पी. पाटील - राधानगरी - १,०५,६४२
  • सत्यजित पाटील-सरुडकर - शाहूवाडी - १,००,०११
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024