इचलकरंजी : आग्रा येथे २२ वी सबज्युनिअर नॅशनल रस्सीखेच स्पर्धा झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्र मुलींच्या १७ वर्षांखालील संघाला रौप्यपदक मिळाले. स्पर्धेमध्ये देशातील १८ राज्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात डीकेटीई मराठी मीडियम हायस्कूलची अक्षता पाटील हिची संघनायक, तर विशाल कवडे, श्रद्धा पाटील, ऋतुजा उकिर्डे, अनघा पाटील, गिरीजा थोरात, श्रेया चौगुले या सात मुलींचा समावेश होता. प्रशिक्षक म्हणून कार्तिक बचाटे यांची निवड झाली होती. या यशाबद्दल खेळाडूंचा संस्थेचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी सत्कार केला. खेळाडूंना मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर, क्रीडाशिक्षक संभाजी बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
१९०३२०२१-आयसीएच-०४
नॅशनल रस्सीखेच स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल डीकेटीई मराठी मीडियम हायस्कूलच्या खेळाडूंचा सत्कार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे आदी उपस्थित होते.