कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक १४ आॅगस्टला मुंबईत होत आहे. गेली १९ वर्षे वंचित असलेल्या कोल्हापूरला हे पद मिळावे यासाठी अॅड. विवेक घाटगे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ठोस अशा कोणाच्याच नावाची चर्चा अद्याप नाही. गोपनीय स्तरावर अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. चर्चेतून नाशिकचे जयवंत जयभावे, ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर (पुणे), वसंत साळोखे (औरंगाबाद), अनिल गोवरदिपे (नागपूर), विठ्ठल देशमुख (मुंबई) यांची नावे पुढे येत आहेत. निवडीच्या पूर्वसंध्येला अंतिम नाव जाहीर होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कौन्सिलचे एकूण २५ सदस्य आहेत. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड केली जाते. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे. कोल्हापूरचे अॅड. विवेक घाटगे यांना कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग व सोलापूर या चार जिल्ह्यांतील सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्यास सर्किट बेंचच्या आंदोलनाची ताकद वाढणार आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते. त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली. या उमेदवारांना राज्यभरातून वकीलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. कोल्हापुरातून अॅड. विवेक घाटगे, सिंधुदुर्गमधून अॅड. संग्राम देसाई, साताऱ्यातून अॅड. वसंतराव भोसले, सोलापुरातून अॅड. मिलिंद थोबडे यांची निवड झाली.
मोर्चेबांधणी सुरुकोल्हापुरातून सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे यांनी तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर अॅड. ए. डी. शेळके, अॅड. बी. डी. शेळके, अॅड. शिवाजीराव चव्हाण यांची सदस्यपदी वर्णी लागली होती. त्यानंतर १९ वर्षांनी कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे मला संधी द्यावी, अशी इच्छा अॅड. घाटगे यांनी कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाशिकचे जयभावे हे प्रत्येक सदस्याच्या संपर्कात आहेत. त्यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. पुण्याचे निंबाळकर हे दोन वेळा अध्यक्ष होते. औरंगाबादचे साळोखे, नागपूरचे गोवरदिपे, मुंबईचे देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारीअॅड. आशिष देशमुख (पुसद- यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर(पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), विवेकानंद घाटगे (कोल्हापूर), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सतीश देशमुख (हिंगोली), अमोल सावंत (औरंगाबाद), अविनाश भिडे (नाशिक), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू आहेत.अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्रत्येकाशी संपर्कात असून संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.- अॅड. विवेक घाटगे , "कोल्हापूर