शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीविरोधात समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकरांचे अन्नत्याग आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 1:51 PM

दरम्यान माजी आमदार मनोहर किनेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे

प्रकाश बेळगोजी  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर होणाऱ्या महामेळाव्याला र गैर मार्गाने विरोध करून  कर्नाटक पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे. परिसरात १४४ कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करून मेळाव्याला परवानगी नाकारली. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू केलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभा करून दशहतीचे वातावरण निर्माण केले आहे. महिला कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची धरपकड सुरू असल्याने त्या घटनेचा निषेधार्थ माजी आमदार समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.कॅम्प महिला पोलिस स्थानकात माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवानी पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या शिवाय माजी आमदार किनेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ए.पी.एम.सी पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. मराठी बांधवांकडून याविरोधात जागोजागी निषेध म्हणून आंदोलन करीत आहेत. भवानी नगर येथे तालुका समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तर कंग्राळी खुर्द येथे सरस्वती पाटील यांनी तर  मराठा कॉलनीत खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.दरम्यान माजी आमदार मनोहर किनेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना संदेश देत घटनेची माहिती दिली आहे. नागपुरात सुरु असलेल्या महाराष्ट्र विधी मंडळाच्या अधिवेशनात या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. विधानसभेत अजित पवार संतापलेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी  करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक