कोरोनाला रोखण्यासाठी सरकार, प्रशासन आणि विविध स्तरांतील घटक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातून साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. या आवाहनाला आणि लॉकडाऊनला सहकार्य म्हणून "माणूस फाउंडेशन"ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती "नाचून नाही तर वाचून साजरी करा" हा मंत्र देत तब्बल १८ तास वाचन करत अभिवादन करण्याचा संकल्प केला. घरी राहा, सुरक्षित राहा, शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन माणूस फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप धम्मरक्षित यांनी केले असता या आवाहनाला महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. घरच्या घरी राहून १८ तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
‘माणूस" च्या अठरा तास वाचन उपक्रमाला महाराष्ट्रभर प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:21 AM