Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:33 PM2024-11-04T19:33:42+5:302024-11-04T19:34:30+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता मोठी चुरस आली. शेवटच्या क्षणी मधुरिमाराजेंनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Madhurimaraje's retreat in Kolhapur Independent candidate Rajesh Latkar's first reaction | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं

 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तिकीट वाटपापासून हा मतदारसंघात चर्चेत आहे. काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली, यानंतर दोनच दिवसात काँग्रेसने उमेदवार बदलून मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज होत राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आज शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला असून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावर आता राजेश लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली.

सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...

आज दिवसभर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर नॉटरिचेबल होते. दरम्यान ते सायंकाळी कलेक्टर ऑफिसजवळ आले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना लाटकर म्हणाले, मी नॉटरिचेबल नव्हतो. मी आज देवाला गेलो होतो. दिवसभर नॉटरिचेबल नव्हतो. घटनेने मला लढण्याचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराने सामोर जात आहे. मी काँग्रेसला मुलाखत दिली होती. काँग्रेसने मला तिसऱ्या यादीत उमेदवारी दिली होती. मी आनंदीत होऊन सर्वांना भेटलो, पण दुसऱ्या दिवशी माझ्या विरोधात बातम्या सुरू झाल्या. माझ्या परस्परच उमेदवार बदलला. माझ्याबरोबर काही चर्चाच केली नाही, असंही लाटकर म्हणाले.

राजेश लाटकर म्हणाले, माझ्याविरोधात जर काही तक्रार होती तर मला पक्ष कार्यालयात मला सांगायचं होतं. पक्षाने मला सन्मानाने सांगितलं असतं तर मी माझ नाव बदललं असतं. आत्मसन्मान कार्यकर्त्यांचा जपला पाहिजे. मला कार्यकर्त्यांनी आपण ही निवडणूक लढली पाहिजे असं सांगितलं.  मी आता सतेज पाटील यांची भेट घेणार आहे. मला पाठिंब्याची मी मागणी करणार आहे, असंही राजेश लाटकर म्हणाले.

महायुतीकडून माझ्यासोबत संपर्क झाला

महायुतीच्या नेत्यांनी मागील काही दिवसापासून संपर्क केला असल्याचा गौप्यस्फोट राजेश लाटकर यांनी केला. लाटकर म्हणाले, मला काही नेते निरोप देत होते. माल ते न्याय देतील भेटायचं का असं सांगत होते. ते मोठ्या नेत्यांची भेट घालून देतो असं सांगत होते, असंही लाटकर म्हणाले.

आता अपक्ष उमेदवार लाटकर विरुद्ध महायुतीचे राजेश क्षीरसागर अशी लढत होणार आहे.राजेश लाटकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Madhurimaraje's retreat in Kolhapur Independent candidate Rajesh Latkar's first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.