Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:19 PM2024-10-28T16:19:00+5:302024-10-28T16:24:45+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Political developments in Kolhapur speed up Displeasure of former corporators over candidature in North Legislative Assembly | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. काल शिंदे गटाची उमेदवारांची यादी समोर आली. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली असून या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी उगड-उघड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवार बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’

काँग्रेसने दोन दिवसापूर्वी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली.  या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचा उमेदवार बदलावा यासाठी नाराज नगरसेवकांनी  मधुरिमाराजे यांची भेट घेत मनधरणी केली आहे. आज याबाबत वाड्यावर बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. 

नाराज कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत आज बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार बदलणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महायुतीमध्येही कोल्हापूर उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन चर्चा सुरू होत्या. शिंदे गटाने काल माजी आमदार राजेश श्रीरसागर यांच्या नावाची घोषणा केली. पहिल्या यादीत महायुतीने उत्तरचा उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. खासदार धनंजय महाडिक यांनी ही जागा भाजपाला मागितल्याचे बोलले जात होते. 

काँग्रेसची उमेदवारी झाल्यानंतर मध्यरात्री नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली. रविवारी दोन्ही गट आमने-सामने आले होते, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Political developments in Kolhapur speed up Displeasure of former corporators over candidature in North Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.