वसंत भोसले कोल्हापूर : सोमवार १२ आॅक्टोबर 2020 पासून महिना अखेरपर्यंतच्या कालावधीत ढगफुटींची संख्या वाढून सुयोग्य काळजी अभावी महाराष्ट्रातील 20 टक्केपेक्षा शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. गेल्या चार दिवसात महाराष्ट्राच्या सर्वच विभागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृष्य पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली आहे.
लाखो हेक्टर क्षेत्रावरील भात, सोयाबन, ऊस, बाजरी, ज्वारी, केळी आदी पिके जमिनदोस्त होत आहेत. हा धोक्का अद्याद दोनआठवडे राहणार आहे. हवामान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्क साधून या धोक्याची तीव्रता किती असेल याचा अंदाज विचारला असता ते म्हणाले, येत्या दोन आठवडय़ात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद तसेच विदर्भात गडचिरोली, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व अमरावती या जिल्ह्य़ात ढगफुटी होऊ शकेल.
महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्य़ातील पाऊस लक्षणीय रित्या वाढू शकेल अशी माहिती ही भौतिकशास्त्रज्ञ जोहरे यांनी दिली. मागील वर्षी 92 लाख हेक्टर शेतीक्षेत्र उध्वस्त झाले होते यंदा त्यापेक्षा जास्त मोठा फटका शेती, राष्ट्रीय अर्थ व्यवस्था, इम्पोर्ट-एक्सपोर्टला बसू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. घाबरुन न जाता व अफवा न पसरविता सतर्क रहात प्रशासनाला सहकार्य करीत सर्वांनी येणार्या काळात धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन देखील जोहरे यांनी केले आहे.उपाय काय?1. भौतिकशास्त्र व एरोडायनॅमिक्सचे नियम वापरून जगभर पुढिल दहा मिनिटांनी डोक्यावर किती पाऊस पडेल याची हजार टक्के माहिती दिली जाते.2. महाराष्ट्रात अद्यावत तंत्रज्ञान व 10 पेट्याफॉली (एकावर सोळा शुन्य इतकी गणिते एका सेकंदात करणारा) क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) उपलब्ध आहे. याच्या मदतीने अचूक व अक्षाश रेखांश नुसार हवामान विभागाने सहा तास आधी ढगफुटींची सुचना प्रशासनाला, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला तसेच जलव्यवस्थापनासाठी पाटबंधारे विभागाला दिल्यास खुप मोठी जिवित आणि वित्तहानी टाळणे शक्य आहे.
जागतिक हवामान संघटनेचे भारत हे आशिया खडातील देशांना सहा तास आधी ढगफुटीची सुचना देणारे नोडल एजन्सी म्हणून असलेले अधिकृत केंद्र आहे. सोलापूर, मुंबई, पुणे, नागपूर व गोवा येथील 500 किलोमीटर रेंजची डॉप्लर रडार यंत्रणा डोळ्यात तेल घालून अहोरात्र काम करीत असते ती यात शेतकर्यांना मोलाची मदत करु शकते.3. शेतातील तयार पिक तातडीने शेतकर्यांनी काढून सुरक्षित कोरड्या ठिकाणी साठविणे आवश्यक आहे. व शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी चर खणणे आवश्यक आहे असे उपाय देखील हवामान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहेत.