शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

दिल्लीत महाराष्ट्राचं ‘पुढचं पाऊल’;खासदारांना मराठी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:21 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिल्लीत मराठी अधिकाºयांकडून महाराष्ट्रातील खासदारांना मार्गदर्शन करण्याचा ‘पुढचं पाऊल’ हा उपक्रम ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिल्लीत मराठी अधिकाºयांकडून महाराष्ट्रातील खासदारांना मार्गदर्शन करण्याचा ‘पुढचं पाऊल’ हा उपक्रम परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी हाती घेतला आहे. त्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत तीस खासदारांनी याचा लाभ घेतला आहे. दिल्लीत ४८ खासदारांच्या दिमतीला २०० मराठी अधिकारी आहेत. विविध प्रकल्प व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हे अधिकारी आपल्या मातीचे काम समजून या खासदारांना विनाशुल्क मदत करणार आहेत.सन १९८३ पासून जपान, रशिया, सीरिया, मालदीव, अमेरिका येथे राजदूत म्हणून काम केलेले ज्ञानेश्वर मुळे हे सध्या दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याकडे पासपोर्टच्या कामाची मुख्य जबाबदारी आहे.नोकरीनिमित्त ३५ वर्षे परराष्ट्र खाते आणि दिल्लीतील एकूण प्रशासनात काम करताना तेथे केंद्रीय मंत्र्यांना काही कळत नाही; मग खासदारांना कळणे ही तर लांबचीच गोष्ट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खासदार म्हणून नेतृत्व करताना जनतेच्याही अपेक्षा असतात; पण दिल्लीतील मंत्रालयरूपी गुहेत शिरून जनतेची कामे करवून आणणे हे भल्याभल्यांना शक्य नसते. रोजच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाहणाºया प्रशासनाला खासदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात फारसा रस नसतो. जेथे ऐकूनच घेतले जात नाही, तेथे मग पुढचे सांगणे नकोच! त्यातही महाराष्ट्रातील खासदार असतील तर मग काय बोलायलाच नको. एकूणच मराठी माणसाविषयी दिल्लीत फारशी आपलेपणाची भावना नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. त्यात भाषेचा अडसर ही महाराष्ट्रीय माणसाच्या एकूण वाटचालीतील सर्वांत मोठा अडसर आहे. मंत्रालयात हिंदी आणि इंग्लिश हीच व्यवहाराची भाषा असल्याने महाराष्ट्रातील खासदारांची आणखी फजिती होते.सर्वांत श्रीमंत राज्य असतानाही महाराष्ट्राचे दिल्लीत लॉबिंग नाही. याउलट बिहारसारख्या मागासलेल्या राज्याचे वजन जास्त दिसते. गुणवत्ता असूनही मागे राहण्यामागे भाषेची अडचण, न्यूनगंड आणि दिल्लीतील प्रशासकीय बाबींची जाण नसणे या बाबी प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत.ज्ञानेश्वर मुळे यांना ही बाब खटकत होती. त्यातूनच त्यांनी ‘पुढचं पाऊल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत दिल्लीतील प्रशासनात काम करणाºया महाराष्ट्रातील २०० अधिकाºयांना त्यांनी एकत्रित केले आहे. यातील प्रत्येक अधिकाºयावर महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करणाºया ४८ खासदारांना मदत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतर हा उपक्रम अधिक वेगाने राबविला जाणार असला तरी त्याची सुरुवात मुळे यांनी वर्षभरापासूनच केलीआहे.४८ पैकी जवळपास ३० खासदारांनी अशा प्रकारे या अधिकाºयांची मदत घेतली आहे. या अधिकाºयांना प्रशासनातील बारकावे माहीत असल्याने त्याचा खासदारांना आपल्या मतदारसंघासह राज्यातील महत्त्वपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी लाभ होणार आहे.महाराष्ट्राचा दबदबा वाढणारखासदारांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी २०० मराठी अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. आराखडे तयार करण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंतची सर्व कामे हे अधिकारीच करणार आहेत. या उपक्रमाचा भविष्यात आणखी विस्तार होणार असल्याने महाराष्ट्राचा दबदबा दिल्लीत वाढण्यासाठी ‘पुढचं पाऊल’ नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल.