शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोल्हापुरातील महिलांना महात्मा गांधी यांनी केले होते मार्गदर्शन तपोवन येथे भेट, विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:44 PM

संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती.

ठळक मुद्देसर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली.

- समीर देशपांडेकोल्हापूर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार ऐकण्याचे भाग्य कोल्हापूरच्या अनेक महिलांना मिळाले होते. २४ आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा यांच्यासह कोल्हापूरच्या तपोवनला भेट दिली होती. तसेच विद्यापीठ हायस्कूलमधील महिला मेळाव्यात या दोघांनीही भाषण केले होते. महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विद्यापीठ हायस्कूलचे एक संस्थापक दीक्षित गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापुरात येणाºया सर्व मान्यवरांना शाळेमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवायचे. कोल्हापुरात भरणाºया खादी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महात्मा गांधी येणार होते. ही संधी घेत तपोवनमध्ये राहणारे अनंतराव कटकोन, बाबू अण्णा कोठावळे, अनंतराव भुर्के, अनंतराव पार्टे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना तपोवनवर आणण्याची जबाबदारी घेतली.

या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि २५ मार्च १९२७ रोजी महात्मा गांधी तपोवनवर आले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘चरखाश्रम’या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर याच दिवशी अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिला मेळावा झाला. महात्मा गांधी यांच्या हस्ते प्रारंभ झालेला चरखाश्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक के. आर. कुलकर्णी तेथे सुतकताई करत असत. त्यांच्यानंतर दादा परांजपे, जयवंतराव सरनाईक यांनी सुतकताईचे काम केले. विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास सुतकताई शिकवली जात होती. महात्मा गांधींच्या या आठवणी आजही कोल्हापुरात सांगितल्या जातात. 

कोल्हापुरात येणाºया सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी तपोवनवर यावे, विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी दीक्षित गुरूजींची इच्छा असे. जयप्रकाश नारायण, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, संत मेहेर बाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल असे अनेक मान्यवर आमच्या हायस्कूलमध्ये येऊन गेले आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भेट ही अशीच संस्मरणीय ठरली आहे.प्रदीप गबाले -निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.