प्रकाश पाटील-- कोपार्डे --महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असताना जनतेची जीवनावश्यक गरज असलेल्या विजेवर महावितरण कंपनीने गेल्या महिन्यापासून वहन आकार लावला असून, वीज बिलात ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. यामुळे जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविणाऱ्या शासनाने ४४०चा झटका दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पूर्वी तीन महिन्यांनी येणारी घरगुती वीज बिले मासिक बिलात करून कंपनीने यामध्ये आकारण्यात येणाऱ्या विविध आकारांत मात्र कोणताच बदल केला नाही. यामुळे आता तीन महिन्यांपासून द्यावे लागणारे सर्व आकार मात्र, महिन्याला द्यावे लागत असल्याने जनतेची लूट होत आहे. सुरक्षा ठेवीसाठी ग्राहकांना वेठीस धरले गेले. प्रत्येक ग्राहकाकडून कायमस्वरूपी एक हजार ते १५०० रुपये सुरक्षा ठेव सध्या महावितरणकडे जमा असून, यातून कोट्यवधींचा निधी महावितरणला मिळाला आहे. याशिवाय मीटर रीडिंगमधील दोष, बंद मीटरमुळे अवास्तव बिल आकारणी करणे, त्याचबरोबर वेळेत वीज बिल भरणा केला नाही, तर आकारण्यात येणारा विलंब आकार हा दहा रुपयांच्या पटीत आकारला जातो. यातूनही जनतेची लूट होते.आता तर महावितरणने डिसेंबर २०१६ पासून आणखी एका आकाराची आकारणी करण्यास सुरुवात केली असून, याला ‘वहन आकार’ असे गोंडस नाव दिले आहे. हा प्रतियुनिट १ रुपये १८ पैसे असा कर दर्शविला आहे व त्याची वसुलीही सुरू केली आहे. किमान २५ युनिट वापर असणाऱ्या ग्राहकास २९ रुपये ५० पैसे जादा द्यावे लागणार आहेत. तर १०० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकास ११८ रुपये वहन आकारातून द्यावे लागणार आहेत. जर याची टक्केवारी पाहता येथून पुढे येणाऱ्या वीज बिलात ३५ ते ४० टक्के वाढ होणार असून, ती प्रत्येक महिन्याला सोसावी लागणार आहे. अगोदरच वीज आकाराबरोबर स्थिर आकार, १६ टक्के वीज शुल्क, वीज विक्रीकर व इंधन समायोजन आकारांद्वारे महावितरण लूट करीत असताना हा वहन आकार कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.वीज निर्मितीपासून ग्राहकांपर्यंत ती पोहोचविण्यापर्यंतचा जो खर्च येतो याचा तपशील ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी या कॉलमचा उल्लेख करण्यात येत आहे. पूर्वीच्या स्थिर आकारात ५ रुपये, तर वीज आकार व वहन आकारामध्ये ३० ते ३५ पैसे वाढ झाली आहे. हा वीज उत्पादन व पुरवठा यासाठी उत्पादन खर्चाप्रमाणे आकारलेला दर आहे. पूर्वीच्या स्थिर आकारात याचा समावेश होता. आता तो वेगळा केला आहे. - राजेंद्र हजारे, कार्यकारी अभियंता ग्रामीण (विभाग-१)‘अच्छे दिन’चा झटकावीज बिलात ३५ ते ४० टक्के वाढ होणार‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविणाऱ्या शासनाकडून ४४० चा झटकासुरक्षा ठेवीसाठी ग्राहकांना वेठीस धरलेप्रत्येक ग्राहकाकडून कायमस्वरूपी एक हजार ते १५०० रुपये सुरक्षा ठेव
‘महावितरण’चा ग्राहकांना झटका
By admin | Published: January 31, 2017 11:14 PM