शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

लाड, आसगावकर यांच्या विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 6:41 PM

Vidhan Parishad Election, shiv sena, congress, ncp, kolhapurnews पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघामधून प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले. त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि साखर-पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्दे छत्रपती शिवाजी चौकात साखर-पेढे वाटप गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघामधून प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले. त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि साखर-पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित होते. गेल्या वेळी पुणे पदवीधरमधून निवडून आलेले भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत पदवीधरांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे यावेळी बदल होणार, हे निश्चित होते. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्या विजयाने हा बदल घडला असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

अरुण लाड, जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने या निवडणुकीत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीच्या ताकदीवर हा विजय खेचून आणला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.

यावेळी ॲड. गुलाबराव घोरपडे, झहिदा मुजावर, संध्या घोटणे, महेश चव्हाण, प्रसाद उगवे, शिवसेनेचे सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, किशोर घाटगे, विक्रम जरग, सुनील देसाई, सचिन पाटील, विनायक फाळके, आदी उपस्थित होते.राष्ट्रवादी कार्यालयातही आनंदोत्सवलाड आणि आसगावकर यांच्या विजयाचा आनंदोत्सव राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयातही करण्यात आला असल्याचे पोवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना