कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर जैन समाज भगवान महावीर प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. २५) होणारा भगवान महावीर जयंती महोत्सव रद्द करण्यात आला आहे. गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ जैन मंदिरामध्ये स्थानिक पुजारी यांच्याहस्ते पंचामृत अभिषेक पूजा व पाळणा होईल.
जैन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव असलेली महावीर जयंती रविवारी साजरी होत आहे. मात्र यंदा कोरोनामुळे जयंतीचे सर्व सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सर्व श्रावक, श्राविकांनी आपल्या घरी प्रतिमापूजन करून परिवारासोबत घरीच महावीर जयंती उत्सव साजरा करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतेश सांगरुळकर व सचिव सुरेश मगदूम यांनी केले आहे.
--