कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (मार्केटिंग फेडरेशन)च्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनलने मंगळवारी दणदणीत विजय मिळवला. यापूर्वी सहा विभागांतील बारा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. महिला गटातून कोल्हापूरच्या धनश्रीदेवी धनराज घाटगे (कागल) यांनी बाजी मारली; तर जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप अरुण नरके हे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन काळे यांनी काम पाहिले.
मार्केटिंग फेडरेशनच्या १९ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ‘नागपूर,’ ‘अमरावती,’ ‘औरंगाबाद,’ ‘नाशिक’ व ‘पुणे’, ‘कोकण’ या सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा १२ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. ‘नांदेड’ विभागातील दाेन व राखीव गटातील पाच अशा सात जागांसाठी रविवारी राज्यातील विविध ठिकाणी ५५७ मतदान झाले होते. मंगळवारी, मुंबईत मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व सात उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
विभागनिहाय बिनविरोध निवडून आलेले संचालक असे नागपूर : अतुल गण्यारपवार (चामोशी, गडचिरोली) व सुभाष रघाताटे (चंद्रपूर)अमरावती : रमेश हिंगणकर (आकोट, अकोला) व नितीन हिवसे (अमरावती)औरंगाबाद : सुनील चव्हाण (अणदूर, तुळजापूर) व पांडुरंग घुगे (मेहगाव, औरंगाबाद)नाशिक : रोहित निकम (माचले, चोपडा) व संजय पवार (जळगाव)पुणे : राहुल काकडे (निंबूत, बारामती, पुणे), संदीप नरके (कसबा बोरगाव, कोल्हापूर)कोकण : जयंत पाटील (पेझारी, अलिबाग, रायगड) व प्रमोद रावराणे (एडगाव, सिंधुदुर्ग)
नांदेड विभाग एकूण मतदान ४१महायुती : आबासाहेब पाटील (सेलू बुद्रूक, लातूर) ३२ व बळवंत पाटील (बेट मोगरा, नांदेड) २६विरोधी : भरत चामले १८
राखीव गट :इतर मागासवर्गीय : दत्तात्रय पानसरे (घारगाव, अहमदनगर) ३३१विरोधी : प्रवीण देशमुख - २१७प्रकाश बन्सोड - २, सुरेश खैरे - ०.अनूसूचित जाती / जमाती : संजय सावकारे (सकोली, भुसावळ) - ३१०विरोधी : वसंतराव कांबळे - २४२, सुभाष पाटील - ०.भटक्या विमुक्त जाती / जमाती : अशोक हटकर (हिवरखेड, बुलढाणा)
विरोधी : सुदाम पवार - २२२, पुरुषोत्तम अलोणे - २
महिला : धनश्रीदेवी घाटगे (वंदूर, काेल्हापूर) ३३४ व अयोध्या धस (पिंपळगाव, धाराशिव) - ३२१विरोधी : अनुसया ठाकरे - १९४ व सायली भगत - १८८
धनश्रीदेवी घाटगे यांना सर्वाधिक मतेकागल (कोल्हापूर)चे माजी आमदार संजय घाटगे यांचे समर्थक धनश्रीदेवी धनराज घाटगे यांना सर्वाधिक म्हणजे ५५७ पैकी ३३४ मते मिळाली.