शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Gram Panchayat Election Result: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी 

By समीर देशपांडे | Published: November 06, 2023 7:27 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याखालोखाल १८ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांना पसंती मिळाली असून, १४ ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे.जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यातील १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ईर्षेने ८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९ पासून प्रत्येक तालुक्याला सोमवारी मतमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे अनेक ठिकाणी चित्रविचित्र आघाड्या गावपातळीवर झाल्या होत्या. त्यामुळे अंदाज वर्तवणेही कठीण बनले.विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाने युती करून उभ्या केलेल्या आघाडीचा ग्रामस्थांनी धुव्वा उडवला असून, अपक्षांनी बाजी मारली आहे. मतदारांना गृहीत धरू नका असाच संदेश यातून दिला आहे. गारगोटीसारख्या तालुकास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या गटाचे सरपंच निवडून आले असून, बहुमत मात्र आमदार प्रकाश आबिटकर गटाचे राहिले आहे.

पन्हाळा तालुक्यातील १४ पैकी ६ ठिकाणी जनसुराज्य आणि एक ठिकाणी नरके गटाने विजय मिळवला असून, स्थानिक आघाड्यांनी पाच, तर आमदार पी. एन. पाटील गटाने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात सात ठिकाणी महायुती सत्तेवर आली असून, ३ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महायुतीच्या सातपैकी ३ ठिकाणी जनसुराज्यची सत्ता आली आहे. महत्त्वाच्या बाजारभोगाव ग्रामपंचायतीत हिर्डेकर भावकीला प्रथमच सत्ता मिळाली आहे.आजरा तालुक्यात चार ठिकाणी महायुती, तर तीन ठिकाणी महाविकास आघाडी व दोन ठिकाणी स्थानिक आघाडी सत्तेवर आली. राधानगरी तालुक्यात महायुतीला तीन, महाविकास आघाडीला दोन, तर स्थानिक आघाड्यांना चार ठिकाणी यश मिळाले. भुदरगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या चारही ग्रामपंचायतींवर महायुतीची सत्ता आली आहे.करवीर तालुक्यातील आठपैकी सात ठिकाणी स्थानिक आघाड्या सत्तेवर आल्या असून, सांगवडेवाडी येथील ग्रामपंचायत सतेज पाटील गटाकडे आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एकमेव अर्जुनवाडीची सत्ता अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या गटाकडे राहिली. चंदगड तालुक्यातील १९ पैकी १६ ठिकाणी महायुतीची सत्ता आली असून, तीन ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले.

निवडणुका झालेल्या तालुकावार ग्रामपंचायती आणि विजयी आघाड्या

तालुका -ग्रामपंचायती -महाविकास आघाडी- महायुती -स्थानिक आघाड्याचंदगड १९/३/१६/००पन्हाळा १४/२/७/५शाहूवाडी १/३/७/००आजरा ९/३/४/२राधानगरी ९/२/३/४करवीर ८/१/००/७भुदरगड ०४/००/४/००गडहिंग्लज ०१/००/१/००

नेत्यांच्या गावात हे घडलंगारगोटी : राहुल देसाई, के. पी. पाटील गटाचे सरपंच विजयी, तर आबिटकरांकडे बहुमतवेळवट्टी : केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई यांच्या गावात अजित पवार गटाची सत्ताशिरोली दुमाला : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील लोकनियुक्त सरपंच.सरवडे : विजयसिंह मोरेंचे चिरंजीव रणधीर बनले लोकनियुक्त सरपंचसुपात्रे : मानसिंग गायकवाड यांची आघाडी सत्तेतपालकरवाडी : माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे चिरंजीव महेश लोकनियुक्त सरपंचकसबा वाळवे : उमेश भोईटे यांच्या गटाचा पराभव, भरत पाटील, अशोक फराकटे यांची सरशीबाजारभोगाव : स्थापनेपासून हिर्डेकर भावकीला प्रथमच सरपंचपद, काँग्रेसच्या सीमा नितीन हिर्डेकर यांना संधी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवस