शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महेश जाधव यांच्यासह पाचजणांची फिल्डिंग

By admin | Published: November 02, 2014 11:51 PM

‘देवस्थान’ अध्यक्षपद : चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक

सचिन भोसले-कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आघाडी सरकारच्या काळात हे पद गेले दीड वर्ष रिक्त होते. त्यावर कुणाची नेमणूक करायची यावर काँग्रेसमध्ये एकमत झाले नाही. नवीन सरकार आल्याने येत्या सहा महिन्यांत सर्वच रिक्त महामंडळांवरील नियुक्त्या भाजपच्यावतीने केल्या जाणार आहेत. देवस्थान समितीवरील रिक्त जागांवर संगीता खाडे व बी. एन. पाटील-मुगळीकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मात्र, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्या पक्षाकडे समितीचे अध्यक्षपद, त्यानुसार अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात होते. मात्र, या पदावर इच्छुक असणारे संजय डी. पाटील, माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, सुरेश कुराडे यांची नावे चर्चेत होती; पण मुख्यमंत्र्यांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील यांना हे पद द्यावयाचे होते. मात्र, मी इच्छुक नसल्याचे सांगत पी. एन. यांनी पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पद कुणाकडे द्यावे, या कारणाने या पदावरची नियुक्तीच रखडली.आता राज्यात भाजपचे सरकार आल्याने जिल्ह्यातून या अध्यक्षपदासाठी भाजप महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जाधव हे नूतन पणन, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे खंदे कार्यकर्ते मानले जातात. त्याचबरोबर शहर मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पडलेल्या मतांचा विचार करता, त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वी काँग्रेसकडे राज्यातील कोल्हापूरचे देवस्थान व शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आहे, तर राष्ट्रवादीकडे पंढरपूर व मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६०० मंदिरांचे व्यवस्थापन येते. देवस्थानच्या जमिनी प्रचंड आहेत. उलाढालही कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे इतके महत्त्वाचे पद असतानाही त्याकडे पी. एन. पाटील यांनी पाठ फिरवली. पाच वर्षे त्यांना या पदाचा उपयोग झाला असता.हा अलिखित संकेतपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा व्याप मोठा आहे. त्यामध्ये ३६०० मंदिरांचे व्यवस्थापन, ५ ते १० हजार एकर जमीन आणि न्यायालयात सुरू असलेले प्रलंबित दावे यांच्याबद्दल सखोल ज्ञान असलेली व्यक्तीच अध्यक्षपदी विराजमान व्हावी. याकरिता कायद्याचा पदवीधर अथवा माहीतगार असणे आवश्यक आहे, असा अलिखित संकेत आहे. यांच्याही नावाची चर्चाया समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या नावाचा आग्रह आमदार महादेवराव महाडिक हे धरू शकतात. कारण राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आमदार निवडून आणण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. याचबरोबर शहरातून विधानसभेसाठी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी महेश जाधव यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे त्यांचेही राजकीय पुनर्वसन होऊ शकते. त्याचबरोबर भाजपचे निष्ठावंत म्हणून अ‍ॅड. संपत पवार, तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशोक देसाई तसेच भाजपमध्ये नव्याने आपल्या गटासह दाखल झालेले माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांच्याही नावाची चर्चा आहे.