शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील तीन हजार ६४ मंदिरांचे व्यवस्थापन करणाºया पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची व कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनाही निवडीची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील तीन हजार ६४ मंदिरांचे व्यवस्थापन करणाºया पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची व कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनाही निवडीची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दूरध्वनीवरून दिली. या निवडीमुळे अध्यक्षपदाला सात वर्षांपूर्वी लागलेले ग्रहण सुटले असून, आता समितीच्या कामकाजाला गती आणि विकासाला दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. विधी व न्याय विभागाकडून अधिकृत लेखी पत्र आल्यानंतर अध्यक्ष व कोषाध्यक्षांकडून कार्यालय प्रवेश केला जाणार आहे.शसनाकडून १९६९ मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची स्थापना करण्यात आली. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाकडून देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी, कोषाध्यक्षपदी तसेच सदस्यपदांवर कार्यकर्त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. समितीच्या अखत्यारीत असलेली मंदिरे, विकासकामे, जमिनी यांबाबतचा निर्णय समितीच्या बैठकीत होऊन पुढे त्याची अंमलबजावणी केली जाते. पूर्वी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने समितीचे अध्यक्षपद काँग्रेसच्या अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांच्याकडे होते; परंतु त्यांचा कार्यकाल २०१० साली संपल्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपद रिक्तच ठेवले. दरम्यान, शासनाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाºयांकडेच देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचाही अतिरिक्त पदभार सोपविला. गेल्या पाच वर्षांपासून जिल्हाधिकारी आणि सचिवांकडून समितीचे कामकाज पाहिले जाते.त्यानंतर २०१४ मध्ये भाजपची सत्ता राज्यात आल्यावर अध्यक्ष, कोषाध्यक्षपदाच्या निवडी होण्याची अपेक्षा होती. मात्र भाजपनेही अडीच वर्षे नियुक्ती केलीच नाही. भाजपकडून सुरुवातीपासूनच अध्यक्षपदाबाबत महेश जाधव यांचे नाव चर्चेत होते. कोषाध्यक्षपद राजेश क्षीरसागर यांच्या कोट्यात दिले जाईल, हे गृहीत धरले जात होते. या दोन्हीही पदांवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. भाजपचे महेश जाधव अध्यक्षपदी, तर कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही उमेदवारांना सदर निवडीची माहिती फोनवरून दिली, तर येत्या दोन दिवसांत विधी व न्याय विभागाकडून अधिकृत लेखी पत्र आल्यानंतर अध्यक्ष व कोषाध्यक्षांकडून कार्यालय प्रवेश केला जाणार आहे.कोषाध्यक्षपदी निवड झालेल्या वैशाली क्षीरसागर यांना समाजकार्याचे बाळकडू बालपणापासूनच त्यांचे वडील कै. बापूसाहेब मोहिते यांच्याकडून मिळाले. पती आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या आंदोलनात्मक, सामाजिक आणि राजकीय कार्यांत त्यांनी त्यांना साथ दिली आहे.कोल्हापुरातील महिला बचत गटांना व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वैशाली क्षीरसागर यांनी २०११ मध्ये ‘भगिनी मंच’ या महिला संघटनेची स्थापना केली. भगिनी मंच संचलित छत्रपती ताराराणी गारमेंट पार्क, तुळजाभवानी गारमेंट पार्क कार्यरत असून, याद्वारे सुमारे ५०० महिलांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, या नवनियुक्तीबद्दल भाजपच्या वतीने महेश जाधव यांचा, तर शिवसेनेच्या वतीने वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.जाधव यांना पक्ष बळकटीच्या कार्याचे फळमहेश जाधव यांनी १९९३-९४ साली भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. तत्कालीन अध्यक्ष सुभाष वोरा व संघटनमंत्री बाबा देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे सदस्य म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. भारतीय जनता युवा मोर्चाचा सदस्य म्हणून काम करताना त्यांना पक्षाचे जिल्हा सरचिटणीसपद देण्यात आले. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापुरात आल्यानंतर जाधव यांच्या कारकिर्दीला वेग आला. त्यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सलग नऊ वर्षांच्या कामाची पावती म्हणून त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. जाधव यांच्या घराला अंबाबाईच्या देवळात तोफेची सलामी देण्याचा मान आहे.